ठाणे येथे होणार्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने……….परिसंवादाचा विषय: मराठी माध्यमात शिकल्याने काय कमावले? न शिकल्याने काय गमावले?
आपल्याला आपल्या मातृभाषेची ओळख ही जन्मत:च असते. मनात जे विचार निर्माण होत असतात ते मातृभाषेतच असतात. कोणत्याही व्यक्तीचा विकास होत असतो तो आपल्या मुळ भाषेतच.
एक अभ्यास म्हणून इंग्रजी
जरुर शिकावी कारण ती जागतिक स्तरावर संवाद साधण्यासाठी आवश्यक आहे. मात्र आपल्या मातृभाषेला कोणतीही परकीय भाषा हा पर्याय होउ शकत नाही.
आपण कदाचित मराठी माध्यमात शिकला नसाल. आपल्याला असं वाटतं का की मातृभाषेत न शिकून आपण काहीतरी गमावलंय?
याच विषयावर ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर
मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
— परिसंवाद
Leave a Reply