मुंबईतील मराठी विज्ञान परिषद ही संस्था मराठीतून विज्ञान प्रसारासाठी कार्य करते. मुंबईतील चुनाभट्टी येथे संस्थेचे मुख्य कार्यालय आहे.
त्यासाठीच संस्थेच्या वतीने अनेक पुस्तके, नियतकालिकांमधून मराठीत विज्ञानविषयक लेखन केले जाते. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
मराठी समाजामध्ये विज्ञानाबद्दल जागरुकता आणि जाणीव निर्माण करण्यासाठी परिषदेची कामे चालतात. परिषदेच्या मध्यवर्ती संस्थेचे विविध वर्गाचे मिळून साडेतीन हजारांहून अधिक सभासद आहेत. परिषदेचे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मिळून ६६ ठिकाणी तर महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, भोपाळ व बेळगाव या ४ ठिकाणी विभाग आहेत. या विभागांमार्फत अनेक कार्यक्रम वर्षभर घेतले जातात. परिषदेतर्फे अंध आणि मूकबधिरांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात.
संस्थेचे विविध विभाग, उपक्रम, प्रकाशने, पुस्तिका तसेच यांची माहिती www.mavipamumbai.org या वेबसाइटवर उपलब्ध आहे. परिषदेचे मुखपत्र “पत्रिका” या नावाने चालविण्यात येत. त्याचे २००७ पासूनचे अंकही वेबसाईटवर उपलब्ध आहेत. मात्र हे अंक PDF फाईलमध्ये असल्यामुळे माहितीचा शोध घेणे शक्य होत नाही. याऐवजी हे अंक text स्वरुपात असते तर जास्त योग्य झाले असते.
साईटवर माहिती बरीच आहे. मात्र बयाचशा links इंग्रजी साईटसना दिलेल्या दिसतात. त्याऐवजी हीच माहिती मराठीत दिली असती तर कदाचित परिषदेच्या उद्दीष्टांची जास्त चांगल्या प्रकारे पूर्ती झाली असती.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply