बन बांबूचे पिवळ्या गाते
आकाशातील अघोरेखिते
चराचरातील दळते संज्ञा
जगण्याची पण (उद्या) प्रतिज्ञा
लिंब कोरतो सांबरशिंगी
जुनी भाकीते नपुसकलिंगी
ज्या वाऱ्यातून त्यात उमटली
नवी पाउले, पण मेलेली
शतशतकांच्या पायलन्स वरती
किती कावळे टिंबे देती
उभा जागृती क्रियापदांचा
खडा पहारा, पण रोबोंचा
अढळ धृवाचा ढळला तारा
सप्तर्षींचा चुकला प्रश्न
गारठल्यावीण गळती गारा
अन् रेडिओवर राधेकृष्ण
बा.सी. मर्ढेकर
मर्ढेकरांची ह्या कवितेला दुसर्या महायुध्दाची पार्श्वभूमी आहे. ह्या कवितेत सम्राट, सेनापती, शास्त्रज्ञ आहेत. फसलेले कट आहेत. आणखी बरेच काही आहे. ह्या कवितेतील पिवळ्या बांबूचे बन कसले आहे ? ते कोठे आहे? ते का गात आहे? आणी हे अवकाशातील अधोरेखित काय आसावे ? कवितेतील ह्या ओळींवरून आपला असा समज होतो की ही कविता निसर्गवर्णनपर आहे. परंतु जरी आपल्याला असे वाटले तरी ही कवितेचा अर्थ जर त्या काळातील (दुसर्या महायुध्दाच्या) संदर्भांवरून लावायचा झाला, तर तो खूपच वेगळा आहे.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा
— चंद्रशेखर बेलसरे
Leave a Reply