नवीन लेखन...

मला समजलेले कर्मफळ

प्रत्येक व्यक्तीला जीवनाच्या चक्रामध्ये सतत कोणते ना कोणते काम करावेच लागते. त्याची प्रत्येक हालचाल हे छोटेसे कर्म बनत जाते. प्रत्येक क्षण हा कर्माने बांधलेला असतो. कर्माववर सभोवताल, परिस्थिती आणि व्यक्तीच्या चेतना ह्याचा परिणाम होत असतो.  व्यक्तीचे अंतरंग व बाह्यांग प्रत्येक कर्माचे परिणाम ठरवतात. ते चांगले वा वाईट, सुख वा दुःख निर्माण करणारे ठरतात. व्यक्तीच्या आवडी निवडीवर ते अघात करतात. ह्यातून दोन गोष्टी निश्चीत स्वरुपाच्या कळतात. कर्म ही सतत घडणारी क्रिया व त्याप्रमाणे त्याचे होणारे परिणाम. जीवन म्हणजेच एक हलचाल. हलचाल म्हणजेच कर्म. कर्म म्हणजेच सुख दुःखाचे चक्र. जीवनभर चालणारे. हे टाळता येत नसले तरी ते सहज आणि सुकर करता येवू शकते. निसर्ग हा त्याच्या ठरलेल्या नियमानुसार चालत असतो. त्यात कधीही बदल केला जात नाही. व्यक्ती आणि त्याचे कर्म ह्याच्याशी निसर्गाचा प्रत्यक्ष संबंध नसतो. व्यक्ती आपल्या प्रत्येक हालचालीसाठी, म्हणजे कर्म करण्यासाठी स्वतंत्र असतो. ज्यामुळे ज्याचे कर्म त्याचे त्यालाच फळ.  सुख वा दुःख ह्या भावनीक समस्या त्यानेच केलेल्या कर्माचे परिणाम असतात. व्यक्तीमध्ये कांही नैसर्गिक उपजत गुणधर्म असतात. अहंकार ( Ego) आणि वासना ( Desire ) . ह्यामुळेच निसर्गाने तुम्हास दिलेल्या जीवनाबद्दल आपूलकी (अस्था) (Attachment ) वाटते. जीवन जगण्या विषयी प्रेम वाटते. कर्माचे होणारे नैसर्गिक परिणाम ही व्यक्तीची चिंताजनक समस्या नसते. परिणाम कसे होईल हा त्यात खरा भाग असतो. व्यक्तीची समस्या असते ती त्याच्या अपेक्षित कर्मफळामुळे. कोणत्याही गोष्टीचे परिणाम कसे होतील, ह्यापेक्षा ते कसे व्हावे ह्या त्याच्या मनांत दडून बसलेल्या विचारामुळे. विद्यार्थी अभ्यास करताना पास होण्याची अपेक्षा करतो. प्रथम येण्याची इच्छा बाळगतो. हे केंव्हाही चांगले व प्रेरणादायी. परंतु हे सारे त्याच्या योग्य प्रयत्न्यावर अवलंबून असते. याची त्याला जाणीव असावी. म्हणजे यश वा अपयश ह्याचे तो विश्लेषन करु शकेल. वासना (Desire) ह्या सुख दुःख निर्माण करीत नसतात. त्या फक्त जीवनचक्र चालविण्यास देहाला मदत करतात. Desire creates attachments for the life. परंतु जीवन कसे असावे, कसे चालावे, कर्माचा कोणता परिणाम व्हावा, ह्या विचारांमध्ये व्यक्ती गुंतला जातो, त्याचवेळी त्याला सुख दुःखाशी सामना करावा लागतो. दुःखाचे कारण इच्छीत अपेक्षाभंग. निसर्गचक्र व निसर्ग नियम ह्यावरच जगातील घडामोडी घडत असतात. त्यामध्ये परिस्थिती, सभोवताल, व व्यक्ती ह्या सर्वांचेच समीकरण लक्षांत घेतले जाऊन घटनेचा सांघीक परिणाम होतो. परंतु व्यक्ती त्या घटनेमध्ये केवळ स्वतःला गुंतवून स्वतःच्या विचारानुसार त्या गोष्टीचा परीणाम कसा व्हावा ही अपेक्षा करतो. हेच कदाचित् निराशेचे कारण बनू शकते. कोणत्याही गोष्टीचा परीणाम प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षेप्रमाणे केंव्हाही होऊ शकणार नाही. हे सत्य आहे. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी योग्य आणि खुप प्रयत्न करणे गरजेचे असते. यश संपादन करण्याचा तो मार्ग आहे. त्याचमुळे तुमच्या विचारांच्या झेपेला मर्यादा असतात.

सभोवताल, काळ, वेळ,  परिस्थिती इत्यादी अनेक पैलू प्रत्येक घटनामध्ये गुंतलेल्या असतात.त्या घटनेच्या गुंत्यामधले अनेक दोर त्या घटनेला बांधलेले असतात. ही व्यक्तीच्या अकलनाबाहेरची गोष्ट असते. निसर्गच त्यांच्या पद्धतीने तो गुंता सोडवू शकतो. व्यक्ती स्वतःच्या विचाराने त्या गुंत्याचा एखादा दोर खेचून निरनिराळ्या गाठी मात्र निर्माण करेल. म्हणूनच म्हटले जाते की घटनेची उकल निसर्गालाच करुं द्या. त्याने दिलेल्या निर्णयास अर्थात परिणामास मान्यता द्या. कर्माच्या फळाची अपेक्षा न करता फक्त योग्य प्रयत्न व्यक्तीने करावे. हाच जीवनाचा महान संदेश असेल. ईश्वरानी प्रत्येक व्यक्तीमध्ये तीन उपजत चेतना शक्ती दिलेल्या असतात.

१ ज्ञान शक्ती. (Power of Knowledge)

२ इच्छा शक्ती. (Power of Desire)

३ क्रिया शक्ती.(Power of Action)

ह्या सर्व उर्जा शक्ती आहेत. कोणतेही काम करण्यासाठी ह्या उत्तेजनात्मक गोष्टी असतात. ह्याच मुलभूत गोष्टीमुळे व्यक्ती कोणतेही कर्म करण्यास उद्युक्त होतो. एक महत्वाचे म्हणजे काम करण्यासाठी चेतना मिळणे ही बाब निराळी.ती निसर्ग देतो. परंतु कोणते काम करावे त्याची दिशा व योजना आखण्याचे कार्य मात्र निसर्ग केव्हांच करीत नसतो. माणसाला दिलेल्या मेंदू–बुद्धी–मन ह्या इंद्रियामार्फत ते होत असते. कार्य करणे ही चेतना वेगळी, कोणते कार्य करणे हा भाग सर्वस्वी निराळा असतो. ते व्यक्तीच्या संस्कारीत विचारावर अवलंबून असते. याचा अर्थ कर्म प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेने, आवडी निवडी नुसार, परिस्थितीनुसार, गरजेनुसार करीत असतो. त्याला निसर्ग फक्त शक्ती देतो. त्यामुळे कर्माचे स्वरुप व त्याचा परिणाम ह्याला फक्त व्यक्तीच जबाबदार असते. कर्मफळ हे त्यालाच भोगावे अथवा उपभोगावे लागते.

येथेच एक गैरसमज निर्माण होत असतो. प्रत्येक कर्मामध्ये व्यक्ती स्वतःला

” कर्म करता ( The Roll of DOER ) ”  याच्या भुमिकेत समजतो. हे अर्धसत्य आहे. कारण विचार, योजना, दिशा, कल्पकता, इत्यादी त्याच्या असतात. तो उर्जा शक्तीला (निसर्गाला ) दुय्यम स्थान देतो. किंवा दुर्लक्ष करतो. स्वताःकडे संपूर्ण घेतलेल्या कर्त्याच्या भूमिकेमुळे जेव्हां इच्छीत कर्मफळ न मिळाल्यास त्याला दुःखी व्हावे लागते. जर हाच कर्मफळाचा भाग प्रत्येक कर्म करताना  ही  “ईश्वरी ईच्छा वा योजना ”  समजून अंगीकारल्या, तर त्याचे तेच दुःख शिथील होईल. कर्माचा जो परिणाम होणार असतो, तो तर होणारच. परंतु ” मी हे केले ” हा अहंकार मीपणा कमी होण्यास मदत होईल समाधानी वृत्ती निर्माण होईल. ते कर्मफळ स्विकारण्याची मनाची तयारी असेल. असे म्हणतात की प्रत्येक काम ईश्वराला साक्षी ठेऊन, त्याची आठवण करीत करावेआणि शेवटी ते कृष्णार्पण वा ईश्वरार्पण करावे. त्यांतच समाधान व शांतता लाभते.

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail-  bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..