गजाननाला करूनी वंदन आरंभिते हे कवन
महाकवी कालीदास हे नामाभिधान
कुण्या देशीची राजकन्या लावण्यवती
सकल कला विद्यांची जाणती होती
उपवर झाली चंपक पित्याला लागला घोर
आणु कुठूनी तुल्यबळ हिज क्ठला राजकुमार
प्रधानपुत्र चुडामणी होता आसक्त तिच्यावर
पुसावयास आला महाली राजकन्यएच्या एकवार
तिला न मुळी रुचले त्याचे हे साहस
घालवूनी दिले महालातून करूनी उपहास
अपमाने पेटला म्हणे मी घेईन याचा बदला
शापे माझ्या मुर्ख पती मिळेल ग तुजला
वार्ता या घटनेची नव्हती दुसया कुणा
राजाने नेमीला अमात्य जामाता शोधण्या
चुडामणी गेला त्याच्यासवे काळजी घेण्या….
— प्रभा मुळे
Leave a Reply