आमिष पैशाचे दावून त्यास सांगितली कपट योजना
शोधु या दोघे मिळूनी एक मुर्ख शिरोमणी
जंगलातून जाताना भेटला एक तरूण
कापत होता झाड फांदीवर बसून उलटीकडून
तुटेल आता झाड मग मी येईन हो खाली
हवा तसाच मिळाला म्हणुनी दोघी आनंदली
अनाथ पोर तो होता गवळ्याने सांभाळिला
काहीच जमत नव्हते म्हणुनी धाडीला
गुरे चारण्याला
डबोले देउउन गवळ्याला मागितला तो पोर
तोही म्हणे घेउन जावे मिटेल माझा घोर
चुडामणीने राजपोषाख घालोनी नटविले त्याला
मुळचे सुंदर रूप पाहूनी वाटे राजपुत्र हा भला
राजास धाडीला निरोप करा तयारी लग्नाची
जामातासह येतो आम्ही आता चिंता कशाची?
— प्रभा मुळे
Leave a Reply