मोहम्मद रफी यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे ‘गाँव की गोरी’ या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना ‘चौदहवी का चाँद’ च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ ‘एक रुपया’ मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं. शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. ‘दोस्ती’ चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी ‘चाहूंगा मैं तुझे… ‘ या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मा.मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता. लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण ‘दिल ने फिर याद किया’ या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी ‘लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत’ असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल मा.रफी यांना आपला गुरु मानायचे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत. रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.*मा.मोहम्मद रफी* यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply