महापौर हा शब्द आपल्या नेहमीच्या वापरात बर्याचदा येतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे गणपतराव नलावडे पुणे शहराचे ‘मेयर’ झाले. ही बातमी कळल्यावर दोन दिवसांनी त्यांना सावरकरांकडून अभिनंदनाचे पत्र आले.
सावरकरांनी त्यांत म्हटले होते, ‘पत्र पाठवण्यास विलंब होत आहे. त्याबद्दल क्षमस्व, ‘मेयर’ या शब्दाला प्रतिशब्द काय असावा याचा विचार करत होतो. तो शब्द मिळाला. ‘महापौर हा शब्द अधिक योग्य वाटतो.’
पत्र मिळताच गणपतराव आपल्या कार्यालयाबाहेर धावले. त्यांनी शिपायाला ‘मेयर ऑफ पुणे’ ची पाटी काढायला लावली. ताबडतोब ‘महापौर’ ची पाटी तयार करुन घेतली आणि लावलीही. तेव्हापासून हा शब्द रोजच्या व्यवहारात सहज रुळला.
मराठीत असे अनेक शब्द आहेत मराठीत कि ज्याचे निर्माते स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहेत.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply