नवीन लेखन...

महाभारत कथा: युद्धापूर्वी मंत्रीमंडळाची शेवटची बैठक

 

(उपस्थित सदस्य: सम्राट दुर्योधन, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, विदुर, दु:शासन, शकुनी, कर्ण आणि सभेत कधी कधी येणारा विकर्ण या शिवाय मुख्य शस्त्राधिकारी व गुप्तचर अधिकारी )

विकर्ण: महाराज, युद्धाचा निर्णय झाला आहे, पण आपण युद्धासाठी खरोखरच तैयार आहोत का? युद्धासाठी शस्त्रास्त्रे, दिव्यास्त्रे (प्रेक्षेपास्त्र) इत्यादींचा पर्याप्त साठा आहे का?

दुर्योधन: विकर्ण, काय म्हणायचं ते स्पष्ट बोल, कोड्यात बोलण्याची ही वेळ नाही.

विकर्ण: कर्णा सारखे योद्धे असतानाही विराट युद्धात आपल्याला पळ काढावा लागला होता, त्या बाबत काय म्हणणे आहे महाराज?

दुर्योधन: विकर्ण आम्ही युद्धाला गेलो नव्हतो. विराट नरेश, त्रिगर्तराज सुशर्मा बरोबर युद्धात गुंतला होता. या संधीचा फायदा उचलून विराटचा हजारों गायींना पळवून आणण्याच्या विचार होता. काही निवडक सैनिकांसह लवकरात लवकर पोहोचण्या साठी जास्त शस्त्र बरोबर घेतले नव्हते, शिवाय रथांवर जास्त सैनिक आणि शस्त्र घेतले असते तर पोहचायला उशीर झाला असता आणि मग संधी निघून गेली असती. आम्हाला विश्वास होता गायींचे रक्षक एक तर आम्हाला पाहताच पळून जातील किंवा थोडाफार प्रतिकार करतील. पण झाले भलतेच, अर्जुनाने बाणांचा वर्षावच सुरु केला. गायींसाठी प्राण धोक्यात घालणे, म्हणजे मूर्ख पणा, म्हणून मैदान सोडावे लागले.

मुख्य शस्त्राधिकारी: महाराज, मला काही बोलायचे आहे, आपल्या शस्त्रागारात धनुष्य-बाण, भाले व गदा यांची भारी करमरता आहे. गेल्या तेरा वर्षांपासून, आपण शस्त्र किंवा विकत घेतली नाही किंवा निर्माण ही केली नाही. म्हणून त्या वेळी गरजेनुसार अस्त्र-शस्त्र पुरविली होती.

दुर्योधन: आश्चर्य आहे, गेल्या तेरा वर्षांत झालेल्या कुठल्या ही बैठकीत कुणी ही मला या बाबतीत काहीच का सांगितले नाही?

विकर्ण: कोण सांगणार? गुरुदेव द्रोण, भीष्म पितामह, कृपाचार्य, विदुर सर्वच पांडवांचे हितचिंतक आणि महाराज, कर्ण, दु:शासन आणि शकुनी, देशोदेशीच्या राजे-महाराज्याना बोलवून पासें खेळण्यात मग्न. महाराज, आपण राज्याची दौलत स्वखुशीने दुसर्यांवर लुटवीत होता.

शकुनी: विकर्ण, याला राजनीती म्हणतात, आज अधिकांश राजे महाराजे आपल्या सोबत आहे, ११ लाख सैन्य या घटकेला आपल्या पाठीशी आहे. आपण सहज युद्धात जिंकू. अजूनही महिना-दोन महिन्यांचा अवधी आहे. लोहारांसोबत, सैनिक आणि जनतेची मदत घेतली तर लक्षाविध शस्त्र तैयार करता येतील. आम्ही जरी द्यूत क्रीडेत मग्न होतो, आपण काय करत होता?

विकर्ण: हा! हा! हा!, शकुनी मामा, तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर, बाण आणि भाल्यांसाठी लोखंड कुठून आणणार. महाराज जरासंधाच्या मृत्यू नंतर मगध (बिहार) नरेश सहदेवाने पांडवांची संबंध जोडले. तांब्याच्या खाणी विराट नरेशच्या राज्यात (राजस्थान) आहे, राजकन्या उत्तर हिचे लग्न अर्जुनपुत्र अभिमन्यूशी करून, त्यांनी ही पांडवांशी सोख्याचे संबंध जोडले आहे. शिवाय कामाअभावी अधिकांश लोहार कुरु राज्य सोडून केंव्हाच निघून गेले आहे. माझ्या विषयी म्हणाल तर, ज्या दिवशी भर दरबारात कुलवधू द्रोपदीचा अपमान झाला होता, त्या दिवसापासून मी राज सभेत आणि मंत्रिमंडळाचा बैठकीत येणे बंद केले होते. आज बोलविले म्हणून आलो. ती ही खरी परिस्थितीची जाणीव करून देण्या साठी. बाकी मी कर्णासारखा, पळपुटा नाही, महाराजांना माहित असेल महारथी कर्णानी अनेक वेळा युद्धातपाठ दाखविली आहे.

दुर्योधन: विकर्ण शांत ही आरोप- प्रत्यारोपाची वेळ नाही,

विदुर: महाराज, मला ही काही म्हणायचे आहे, विकर्णाने भीष्म पितामह समेत, आमच्या वर लावलेला आरोप चुकीचा आहे. त्यानी माफी मागितली पाहिजे. महाराजांनी आमच्या सारख्या म्हाताऱ्यानी दिलेले कित्येक मोलाचे सल्ले, पायदळी तुटविले आहे. सभेत चूप बसण्याशिवाय आम्ही काय करणार. पण या विषयावर चर्चे आधी पांडवांची तैयारी कशी आहे, हे जाणून घेतले पाहिजे. मगच या विषयावर सार्थक चर्चा करता येईल.

दुर्योधन: गुप्तचर प्रमुख, या बाबत आपला अहवाल सादर करावा.

गुप्तचर प्रमुख: महाराज, आपले चिरशत्रू पांचाल नरेश द्रुपद युद्धाची तैयारी गेल्या १३-१४ वर्षांपासून करीत आहे, त्यांनी मोठ्याप्रमाणावर शस्त्र निर्मितीचा ठेका मगध नरेशांना दिला होता. अस्त्र- शस्त्रांचा मोठा साठा घेऊन मगध नरेश आणि पांचाल नरेश पांडवाना येऊन मिळाले सुद्धा आहे. गेल्या वर्षांत मी कित्येक वेळा, आपले सुरक्षा मंत्री आणि सेनानी पितामह भीष्म यांना या बाबत सूचना दिली होती.

भीष्म: कुरु राज्याला कुठल्या ही शत्रू पासून धोका नव्हता आणि आज ही नाही आहे. अस्त्र-शस्त्रांवर उगाच राज्याचा खजिना खर्चिक करणे व्यर्थ, असे मी मानतो. तरी ही सुरक्षेसाठी आवश्यक अस्त्र-शस्त्र खरेदी साठी कित्येकदा अर्थमंत्री दुशासनपाशी विनंती केली होती. पण अर्थमंत्र्यांनी त्या साठी कधीच पर्याप्त धन उपलब्ध केले नाही, या वर आम्ही काय करणार. त्यांनाच जाब विचारा.

विदुर: मला ही काही म्हणायचे आहे, आपल्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी, पांडव युद्धाची तैयारी फार पूर्वी पासून केली आहे. दूरदर्शीपणा दाखवून पांडवानी युद्धात पराजित राजांशी ही सोख्याचे संबंध जोडले आहे. आर्य, अनार्य, नाग, राक्षस कुणाला ही हीन आणि परके मानले नाही. अर्जुनाने गंधर्व राज चित्रसेन, देवराज इंद्र आणि हिमालयात राहणाऱ्या भगवान शंकर यांना प्रसन्न करून ब्रम्हास्त्र सहित अनेक दिव्यास्त्रे (आकाशगामी) मिळविली आहे. अर्जुनाने नागराणी उलूपीशी लग्न करून पूर्व देशातील नागांशी सोख्याचे संबंध जोडले. नागांनी ही बाणाच्या पात्यांना लावण्यासाठी जहाल विष पाठविले आहे. शिवाय भीमसेन यांनी हिडम्बेशी लग्न करून राक्षसांची संबंध जोडले, धर्मयुद्धाचे कुठले ही नियम न मानणारे रात्री युद्ध करणारे

हे राक्षस ही पांडवाना मिळाले आहे. महाराज आपण काय केले, कुठ्ल्याशी शक्तिशाली देवतांना प्रसन्न करून, दिव्यास्त्रे मिळविण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त कर्णा जवळ एक दिव्यास्त्र आहे, ते ही तो अर्जुना विरुद्ध वापरेल. अश्वथाम्या जवळ एक विनाशकारी ब्रम्हास्त्र ज्याचा नियमानुसार युद्धात उपयोग करता येत नाही. .. माझे आज ही म्हणणे आहे, पांडवांशी तह करणेच सद्य परिस्थितीत योग्य.

भीष्म: दुर्योधन, या घटकेला आपल्या भंडारग्रहात केवळ अस्त्र- शास्त्रांच्या नावाने केवळ भंगार आहे, जुनी जंग लागलेली धनुष्य, बाण गदा आणि तलवारी आणि त्यांची अवस्था, गदा कुणाच्या डोक्यावर मारली तर गदाच फुटून जाईल, तलवार तुटून जाईल आणि बाण तर शत्रू पर्यंत पोहचणार ही नाही. कश्याचा जोरावर आपण युद्ध जिंकणार? पराभव निश्चित आहे.

दुर्योधन: पितामह म्हणून तुमचा आदर करतो, पुन्हा पराजयाची भाषा बोलू नका. हे युद्ध आपल्यावर लादल्या गेलं आहे, आपण कुणावर आक्रमण केलेले नाही. शिवाय आज पाच गावे पांडवाना दिली तरी ही ते पूर्ण राज्य गिळंकृत केल्या शिवाय राहणार नाही. हस्तिनापूरच्या रक्षणासाठी युद्ध हे लढावेच लागणार. आपल्याला लढायचे नसेल तर तसे सांगा, मी कुणा दुसऱ्याला सेनापती नियुक्त करतो.

भीष्म: दुर्योधन, हस्तिनापूरच्या सुरक्षेसाठी मी वचनबद्ध, आहे. सद्य परिस्थितीत युद्ध जिंकायचे असेल तर शस्त्रांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. सर्व सेनानी आणि सैनिकांना काही सूचना पाळाव्याच लागतील. एक, शत्रू जवळ आल्या शिवाय अस्त्र- शस्त्रांचा वापर करू नये. उदा: शत्रू टप्यात आल्या शिवाय भाले आणि बाण वापरू नये. गदा उगाच हवेत फेकू नव्हे, हा भित्रा कर्ण शत्रूला दूर ठेवण्यासाठी हवेत हजारो बाण व्यर्थ करतो, कर्णासमान योद्धे युद्धापासून दूर ठेवलेले बरे.

कर्ण: बाणाचा वर्षाव करून, शत्रूच्या मनात भीती उत्पन्न करून युद्ध जिंकता येते. व्यर्थ प्राण हानी करण्यात अर्थ नसतो. शिवाय शत्रू जवळ आल्यास, त्याचा ही नेम वर्मी लागू शकतो. आपल्या सैनिकांचे प्राण धोक्यात टाकणे ही काही युद्ध नीती नाही.

भीष्म: सद्य परिस्थितीत हीच युद्ध नीती योग्य आहे, लक्षात ठेवा, हे युद्ध जिंकण्यासाठी नव्हे एका दुसऱ्याला मारण्यासाठी आहे. कुठल्याही एका पक्षाच्या सर्व योद्धांचा प्राणांत झाल्या शिवाय हे युद्ध संपणार नाही. मी जिवंत असे पर्यंत युद्धाची हीच नीती पाळावी लागेल. दुर्योधन तुला कर्णा सारख्या सैनिकांना युद्धापासून दूर ठेवावे लागेल.

आपला सैनिक म्हणून उल्लेख केल्याने कर्ण चिडला आणि रागाने म्हणाला, मला ही तुमच्या नेतृत्व खाली युद्ध लढण्याची इच्छा नाही. आपल्या जवळ भरपूर सैन्य आहे, मरण्यासाठी. माझी ही एक सूचना आहे. एका सैनिकापाशी ढाल आणि एका पाशी तलवार असे द्यावे, दोन सैनिक एकत्र लढतील. एक ढालीने बचाव करेल आणि दुसरा तलवारीने आक्रमण. अश्यारीतीने अस्त्र-शस्त्रांचा योग्य वापर करता येईल.

दुर्योधन: कर्णा शांत हो. पितामह, मला आपल्या सर्व सूचना मान्य आहे आणि कर्णाची दिलेली सूचना ही आवडली या शिवाय आपल्या समोर दुसरा पर्यायच नाही. पितामह, सर्व सेनानी आणि सैनिकापाशी हे निर्देश पोहचविण्याची व्यवस्था करा. गुरुदेव, शुभ मुहूर्तावर काढा, त्यानुसार कुरुक्षेत्राकडे प्रस्थान करण्याची व्यवस्था करता येईल. बैठक समाप्तीची घोषणा झाली.

(टीप: कल्पनेत झालेल्या हस्तिनापुरातल्या उत्खननात या बैठकीची ध्वनीभित स्वामी त्रिकालदर्शी यांना सापडली होती. घटनेच्या सत्यते बाबत कुणी आक्षेप घेऊ नये. या बैठीकीची तुलना आपल्या आजच्या सैन्य तैयारी बाबत न करणे उचित)

— विवेक पटाईत

Avatar
About विवेक पटाईत 194 Articles
संवेदनशील मन, लेखन व वाचनाची आवड मराठीसृष्टी वर नियमित लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..