गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात अतिरेक्यांचे नेटवर्क विस्तारू लागले आहे. स्थानिक पातळीवरील गरजू, बेरोजगार तरुणांना हाताशी धरून नवनवीन अतिरेकी कारवायांच्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. त्यासाठी विविध शहरांमधून माहिती गोळा करणारे स्लिपर्स सेल कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या समाजजीवनाला लागत असलेली ही कीड वेळीच रोखली नाही तर राज्याचे अपरिमित नुकसान होऊ शकते.भारतात दहशतवादी कारवाया करणार्या अतिरेकी संघटनांना पाकिस्तानातून बळ मिळते. आवश्यक असलेले पैसे, दारूगोळा, प्रशिक्षण आणि अन्य देशात पळून जाण्यासाठी लागणारे पासपोर्ट यांचा पुरवठा पाकिस्तानातील आय.एस.आय. संघटनेकडून केला जात असतो. पुण्याच्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा कट उघडकीस आल्यानंतर विविध विषयांनी महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांच्या हाती येत आहे. त्यातल्या त्यात वेगाने विस्तारणार्या अतिरेक्यांच्या नेटवर्कची कल्पना नेमकेपणाने येते. हे नेटवर्क रातोरात उभे राहिले नसून अत्यंत हुशारीने आणि शत्रू राष्ट्रांची मदत घेऊन त्याचा विस्तार केला जात आहे. अमेरिका या सार्या कामांमध्ये पाकिस्तानला छुपी मदत करत असते. कारण भारत ही जगातली एक उभरती अर्थव्यवस्था असून तिच्या प्रगतीमध्ये जेवढे अडथळे आणता येतील तेवढे अडथळे आणणे आपल्यासाठी आवश्यक आहे अशी अमेरिकेची भावना आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या सार्या अतिरेकी कारवायांमागे एक आर्थिक प्रेरणा आहे. त्यामुळेच या अतिरेक्यांनी मुंबई शहाराला लक्ष्य केले आहे. कारण मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. गेल्या पाच वर्षात मुंबई शहरावर तीन मोठे हल्ले होणे ही गोष्ट बरीच सूचक आहे. अशा रितीने लक्ष्य केल्यानंतर मुंबई हे या दहशतवाद्यांच्या हालचालींचे केंद्र बनल्यास नवल वाटणार नाही. तसे ते बनलेही आहे. मुं
ई हे अतिशय दाट लोकवस्तीचे औद्योगिक शहर आहे. तिथल्या झोपडपट्ट्यांत माणसे अक्षरश: खुराड्यातल्या कोंबड्यांप्रमाणे रहात असतात. या शहरातल्या पोलिसांना मुंबईतल्या गुन्हेगारीवर
नियंत्रण ठेवता येत नाही, यामागे हे एक महत्वाचे कारण आहे.एखादा दहशतवादी किवा परदेशातला घुसखोर मुंबईत येऊन लपला
तर एक कोटी 80 लाख चेहर्यांच्या या शहरामध्ये त्याचा चेहरा सहज लपून जाऊ शकतो. त्यामुळे दहशतवाद्यांना लपण्यासाठी मुंबई आणि मुंबईतल्या झोपडपट्ट्या हे आदर्श ठिकाण झालेले आहे. या शहरामध्ये बांगला देश आणि पाकिस्तानातून आलेले हजारो घुसखोर बेकायदारित्या रहात असतात असे सांगितले जाते. शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे अनेकदा असा आरोप करत असत. महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आल्यास या सार्या घुसखोरांना सहज हाकलून देऊ, अशाही घोषणा ते करत असत. परंतु प्रत्यक्ष सत्तेवर आल्यानंतर भाजप-सेना युतीच्या सरकारने पाच जणांना बांगला देशी म्हणून शोधून काढले आणि त्यांची रवानगी केली. परंतु त्यांना घेऊन जाणारी गाडी भारतातल्याच लोकांनी अडवली आणि हे बांगला देशी नसून बंगाली आहेत असे म्हणून पोलिसांच्या हातून त्यांची सुटका केली. मुंबई शहरातून घुसखोरांना शोधणे आणि त्यांना पकडणे किती अवघड आहे याचे दर्शन यावेळी घडले. मुंबई शहरामध्ये एकदा अशा लोकांचा सुळसुळाट झाला की त्यांच्या कारवायांसाठी लागणारी समुग्री खरेदी करण्याकरिता मुंबईचाच वापर होणार हे उघड आहे. जसा मुंबईत लपलेला माणूस शोधणे अवघड तसेच मुंबईत केलेली स्फोटकांच्या साहित्यांची खरेदी शोधणेही अवघड. म्हणूनच अलीकडे घडलेल्या काही कारवायांत वापरले गेलेले मोबाईल फोन, त्यांचे नकली सीमकार्ड आणि अन्य काही उपकरणे खरेदी मुंबईतच केली गेली असल्याचे आढळले. दहशतवादी कारवायांचा विषय निघताच काश्मीर, पंजाब अशा राज्यांचीच नावे समोर य
तात. भारताच्या ईशान्य भागातील छोट्या राज्यांमध्येही काही प्रमाणात दहशतवादी कारवाया केंद्रित झाल्या असल्याचे वारंवार म्हटले जाते. परंतु मुंबईचेही नाव आता अतिरेक्यांच्या रडारवर आले आहे आणि बघता बघता या शहराची ओळख सुद्धा अतिरेकी कारवायांचे केंद्र म्हणून व्हायला लागली आहे.पुण्याच्या जर्मन बेकरीतील स्फोटाच्या प्रकारात मराठवाड्यातील बीड येथील हिमायत बेग या तरुणाला अटक करण्यात आली, त्याने मराठवाड्यातल्याच उदगीर येथे एक दुकान भाड्याने घेऊन बॉम्ब तयार केले असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकारात एकटा माणूस काहीच करू शकत नाही. त्याला अनेकांची साथ असल्याशिवाय उदगीरमध्ये हा बॉम्ब तयार झालेला नाही. कदाचित कोणी त्याला सक्रीय मदत केलेलीच असेल असे खात्रीने सांगता येत नाही. परंतु हा तरुण संशयास्पद हालचाली करत आहे हे अनेकांना नक्कीच समजलेले असेल आणि एवढे समजून सुद्धा काही लोकांनी त्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे हे मात्र खात्रीलायकरित्या सांगता येते. हिमायत बेग याने परभणी, नांदेड, औरंगाबाद या जिल्ह्यातील काही तरुणांना जिहादच्या कामात ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातल्या बहुतेक तरुणांनी या कारवायांत सहभागी होण्यास नकार दिला ही गोष्ट निश्चितचआश्वासक आहे. परंतु अशा प्रकारे हा हिमायत बेग आपल्याला या कारवायांत ओढण्याच्या प्रयत्नात आहे याची खबर या तरुणांनी पोलिसांना दिलेली नाही, या गोष्टीकडे आपले दुलर्क्ष होत आहे. ही प्रवृत्ती नकळत दहशतवादाला खतपाणी घालत असते आणि या प्रवृत्तीची पाळेमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये निश्चितपणे पसरायला लागलेली आहेत.उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये सीमी या संघटनेच्या कारवाया पसरत चालल्या होत्या. या भागातले काही तरुण या कारवायांत ओढले गेलेले होते. त्यावेळी महाराष्ट्राच्या
विविध भागांमध्ये हा दहशतवाद कसा फोफावत आहे याची चर्चाही झाली होती. आता उत्तर महाराष्ट्राच्या सोबतच ही प्रवृत्ती मराठवाड्यात आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूरसारख्या शहरात सुद्धा हातपाय पसरत आहे याचा सखोल अभ्यास सरकारी यंत्रणेने केला आहे की नाही याविषयी शंका वाटते. ही शंका लक्षात घेऊन यापुढील काळात पोलीस यंत्रणेला जागरुक नागरिकांचे काही गट उभे करण्यावर भर द्यावा लागणार आहे. केवळ खकी वेशातील पोलीसच नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी
कटिबद्ध नाही तर साध्या वेशातील सामान्य नागरिकही पोलिसांची पर्यायाने देशाची मदत करू शकतो हे दाखवण्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे. एका आकडेवारीनुसार भारतात अडीच हजार नागरिकांमध्ये एक पोलीस आहे. अशा
परिस्थितीत लाखभर लोकांच्या सुरक्षिततेला 40 पोलीस कसे पुरे पडणार याचा विचार व्हायला हवा. किंबहुना, हे लक्षात घेऊनच या पुढील काळात सुरक्षा यंत्रणेची रचना करावी लागणार आहे.
(अद्वैत फीचर्स)
— संजय जोशी
Leave a Reply