नवीन लेखन...

महिलांचा सन्मान पुराणातच ?



समाजात स्त्रियांचा सन्मान केला जावा असे कितीही सांगितले जात असले तरीही आपल्या देशात अजून तरी या बाबतीत मध्ययुगीन मानसिकताच दिसत आहे. परवा एकाच दिवशी देशातील विविध न्यायालयांनी बलात्कार आणि खुनाच्या तीन बहुचर्चित गुन्ह्यांमध्ये काही आरोपींना शिक्षा सुनावली

तर काहींना पुराव्याअभावी निर्दोष सोडले. देवीचे रूप मानली गेलेली स्त्री खरोखरच किती सुरक्षित आहे याचा नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर घेतलेला वेध.भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवीसमान मानले जाते. तिला गृहलक्ष्मीसारखी देवत्वापर्यंत पोहोचवणारी अनेक विशेषणेही लावली जातात. पण, स्त्रीबद्दलची ही भावना केवळ साहित्यात आणि पुराणांमध्येच आढळते. समाजातील पुरुष महिलांकडे बुभूक्षित नजरेने पाहताना दिसतात. दिल्लीसारख्या अनेक शहरांमध्ये अंधार पडल्यानंतर स्त्रियांना घराबाहेर पडण्याचा विचारही करता येत नाही. चालत्या रेल्वेतही स्त्रीवर बलात्कार केला जातो. दरोडा घालण्याच्या उद्देशाने घरात शिरल्यानंतर घरातील स्त्रियांची निर्घृण हत्या करून त्यांच्या निर्जीव देहावर पाशवी बलात्कार करणारे नराधमही आपल्या देशात सापडतात. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीतील कॅबचालक व्यवसायाची गरज म्हणून वेळी-अवेळी कामाला जाणार्‍या महिलांवर अत्याचार करून त्यांची हत्या करतात. अशा परिस्थितीत देशातील महिला सुरक्षित आहेत असे म्हणणे धाडसाचे ठरेल.यत्र नार्यस्तू पूज्यंते वगैरे अनेक सुभाषिते आणि वचने आपल्या पुराणांत आणि साहित्यात विखरून पडलेली आहेत पण त्यांचा आपल्या प्रत्यक्ष जीवनात थोडासाही आढळ होताना दिसत नाही. काल देशाच्या तीन विविध वरिष्ठ न्यायालयांत या संबंधातले खटले निकाली निघाले आणि आपल्या या संबंधातल्या वर्तनावर प्रकाश टाकून गेले. गेल्या दहा वर्षांपासून देशभर गाजत असलेल्या प्रियदर्शि

ी मुट्टू खून खटल्यातला आरोपी संतोषकुमार सिंग याला उच्च न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्य न्यायालयाने सौम्य केली आणि ती जन्मठेपेत परिवर्तीत केली. शिक्षा सौम्य झाली असली तरीही तो आपल्या देशात या सर्वात कठोर शिक्षेच्या संदर्भात सुरू असलेल्या वादाचा एक भाग आहे पण मुळात त्याला सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले आहे, त्याला निर्दोष

सोडायला नकार दिला आहे. एक सुशिक्षित वकील पैशाच्या मस्तीत एखादी तरुणी आपल्याला बधत नाही असे पाहून चिडून तिचा खून करू शकतो हे या प्रकरणात पुरतेपणी सिद्ध झाले. या घटनेतील आरोपी वकिल आहे. पण, तो डॉक्टर, इंजिनिअर किंवा प्रतिष्ठित व्यावसायिकही असू शकेल.आपल्या समाजात पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची एक दृष्टीच या निमित्ताने प्रकट झाली आहे. याच दिवशी एका न्यायालयाने कॉल सेंटरमध्ये काम करणार्‍या महिलेच्या हत्येबद्दल अशा कर्मचार्‍यांची वाहतूक करणार्‍या वाहनाच्या चालकाला दोषी ठरवले आहे. या संबंधात तर या चालकाने आपल्या नृशंसतेचे भीषण दर्शन घडवले आहे. अनेक प्रकारच्या युक्त्या करून त्याने तिला एकटीलाच आपल्या गाडीत घेतले आणि निर्जन रस्त्यावर तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केला. हा अपराध सिद्ध झाला आहे. हा चालक अशिक्षित आहे. शिक्षणाने माणूस विचारी होतो आणि अशिक्षित माणूस अविचारी असतो त्यामुळे त्याने हा अविचार केला गेला असावा असे म्हणता येते. पण, ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस च्या (टीआयएसएस) त्या सहा विद्यार्थ्यांनी तर अविचार करायला नको होता. समाजात काही तरी संशोधनात्मक काम करण्याचे शिक्षण घेत असलेल्या सुशिक्षित विद्यार्थ्यांनी तर एका अमेरिकन मुलीवर बलात्कार केला. खरे तर असा अविचार करणार्‍यांमध्ये सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेदभाव न करता सुंसस्कृत आणि असंस्कृत असा भेदभाव करायला हवा. कार
ण अशी विकृती मनात राखणार्‍या आणि ती प्रत्यक्षात उतरवणार्‍या नराधमांना असंस्कृतच म्हटले पाहिजे.टीआयएसएसच्या विद्यार्थ्यांना मुंबईतील एका कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. या आरोपींच्या विरोधातील पुरावा पुरेसा नसल्यामुळे त्यांना न्यायालयाने संशयाचा फायदा देऊन सोडले आहे. त्यांनी हे नृशंस केलेलेच नाही असे काही नि:संदिग्धपणे आणि निरपवादपणे निर्दोष ठरवण्यात आलेले नाही. संशयाचा फायदा दिलेला आहे. या प्रकरणातली तरुणी परदेशातली आहे तेव्हा तिला आपल्या वरच्या या अत्याचाराचा सबळ पुरावा ठरावा असा जबाब देता आलेला नसेल म्हणून हे विद्यार्थी सुटले असतीलही पण सरकार या प्रकरणात उच्च न्यायालयात जाणार असेल तर तिथे हे लोक निर्दोष सुटतीलच असे काही सांगता येत नाही. बलात्काराच्या प्रकरणात आता न्यायालयांचे दृष्टीकोन बदलत चालले आहेत. कर्नाटकातल्या एका अशाच प्रकरणात सारे वैद्यकीय पुरावे फिर्यादीच्या विरोधात गेले असतानाही न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. बलात्कार झालेली मुलगी अशी घटना घडली आहे असे म्हणत असेल आणि काही परिस्थितीजन्य पुरावे हाती असतील तर तेवढ्यावरही आरोपीला शिक्षा झाली पाहिजे असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. कोणाला तरी गुंतवण्यासाठी एखादी महिला किंवा तरुणी आपल्या अब्रुचा बाजार मांडत नसते हा आधार मानावा असे न्यायालयाचे मत आहे.येथे तर ही तरुणी अमेरिकेतली आहे. ती तर नक्कीच असे करणार नाही, हा आधार मानून कदाचित उच्च न्यायालयात या खटल्यात कायद्याचा आणि पुराव्याचा किस पडू शकतो आणि या सहाजणांना खडी फोडायला जावे लागू शकते. मात्र, या सगळ्या प्रकरणात आपण महिलांशी वागण्याबाबत किती मध्ययुगीन मानसिकतेत आहोत हे दिसून आले आहे. आता नवरात्राची सुरूवात झाली आहे. देशभर स्त्री शक्तीच्या रुपात देवीची पूजा केली जाणार आहे. क

ाही ठिकाणी स्त्री शक्तीच्या जागृतीचा आविष्कार घडवण्यासाठी श्रीसूक्ताचे जाहीर पाठ केले जाणार आहेत पण आपल्या मानसिकतेत काही फरक पडत नाही. आपण स्त्रीयांकडे अजूनही उपभोग्य वस्तू म्हणूनच पहात असतो असे दिसून येत आहे. विशेषत: परस्त्रीच्या बाबत आपण फार अनुदार आहोत. परस्त्रीला माते समान माना असे कितीही सांगितले जात असले तरीही आपण ते मानायला तयार नाही. परस्त्रीशी आपण सन्मानाने वागूच शकत नाही. सभ्यपणानेही वागू शकत नाही. पूर्वी स्त्रिया फारशा घराबाहेर

पडत नसत. त्यांचा समाजातला वावर कमी होता. त्यामुळे एखादी स्त्री बाहेर दिसली की कामुक पुरुषाच्या बुभुक्षित नजरा तिच्यावर पडत असत. पण आता

त्या मोठ्या संख्येने वावरत आहेत अशा स्थितीत तरी आपला दृष्टीकोन आणि नजर बदलली पाहिजे होती पण अजूनही काही फरक पडत नाही. स्त्री आणि पुरुष यांना समान मानावे ही आपली शिकवण केवळ कागदावरच रहायला लागली आहे. समाजात शिक्षण वाढत चालले असूनही या वागण्यात काही बदल झालेला दिसत नाही.

— मधुरा कुलकर्णी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..