मदनोत्सवाचा (वैलेंटाइन) दिन बघून समोर
मनात ठरविले,प्रणय करावे घनघोर
भेट देण्यासाठी प्रियेला,गाठली मी बाग
पण परदेशी फुलांचा मनात आला राग ||१||
मी दिले तिला कमळचे फुल
मला वाटले तीही उड़विल प्रेमधुल
हातात घेउनिया कमळ तो लाल
चटकन सुजविला तिने माझा गाल ||२||
मी तिला पुसिले,काय गं हे केले ?
ती म्हणे भाजपच्या ऐवजी कांग्रेसचे चिन्ह दिले
म्हणून म्हणतो दोस्तहो चला जरा जपून
ती म्हणेल तेव्हाच सुरुवात करायची आपुन…. ||३||
* काव्य *
नरेन्द्र श्रावणजी लोहबरे
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply