माझाच जन्म व्हावा
म्ह्णून माझ्या आई-बापाचं मिलन झालेलं नव्हतं…
माझ्या जन्माचं कोडं
त्यांना आणि मलाही कधी उलगडलं नव्हतं…
माझा जन्म आता
मला, माझ्या आई-बाबाला आणि जगालाही ओझं ठरलं होतं…
मला शक्य असतं तर
या जगात जन्माला येणंच मी स्वतःहून नाकारलं असतं…
किती बरं झालं असतं
या जगात जन्माला येणं न येणं हे आपल्या हातात असतं…
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016
Leave a Reply