नवीन लेखन...

माझी चेन्नई सफर

ह्याचेच दुसरे उदा. लक्ष्मी मित्तल ह्या व्यावसायिकांचे. राजस्थान ह्या प्रांतातील सुपुत्र श्रीयुत लक्ष्मी मित्तल हे आज इंग्लंडसारख्या पर मुलुखात एक मोठे उद्योगपती म्हणून नावारूपाला आलेले आहेत. जागतिक स्तरावरील “अर्सेलर” या नामचीन कंपनीला त्यांनी खरेदी केले व आपल्या व्यावसायिक साम्राज्यात सामावून घेतले.

ते मुळचे तेथील होते का? तर नाही. परंतु तेथें जाण्याचा त्यांचा निर्णय योग्यच होता नां? आज त्यांना काय कमी आहे? ते वाटेल तेव्हा भारतात येऊ शकतात, जगामध्ये कोठेही फिरू शकतात, आपल्या नातेवाईकांना भेटू शकतात. अशी बरीच उदाहरणे सापडतील की जी आज जागतिक पातळीवरदेखील यशस्वी व्यक्तिमत्वे म्हणून ओळखली जातात.

आपले महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व श्रीयुत विक्रम पंडित, हे आज जागतिक पातळीवरील “सिटी” बँकेचे सर्वेसर्वा आहेतच ना? असेच दुसरे एक मराठी व्यक्तिमत्व म्हणजे श्रीयुत धनंजय दातार. ह्यांनी अरब देशात जावून आपला मसाल्यांचा व्यवसाय उभा केला आणि आज ते तेथें “अल-आदिल ट्रेडिंग” या कंपनीचे युनायटेड अरब एमिरेट्समध्ये गेली २५ वर्षे चेअरमन आणि सी.ई.ओ. म्हणून कार्यरत आहेत. आज ते दुबईतील “मसाला किंग” म्हणून ओळखले जातात. श्रीयुत मंदार जोगळेकर हे तर आपल्या रत्नागिरी जवळच्या साखरप्याचे. ह्यांनी देखील अमेरिकेत जावून आपला पुस्तकांचा व्यवसाय उभा केला आणि आज ते “बुकगंगा डॉट कॉम” ह्या साईटवरून मराठी प्रकाशकांची हजारो मराठी पुस्तके जागतिक पातळीवर घरोघरी पोहचविण्याचे कार्य मोठ्या जोमाने पार पाडीत आहेत, तर “ग्लोबलमराठी डॉट कॉमच्या” रुपाने ते सोशियल नेटवर्किंग साईट देखील चालवीत आहेत. माय विश्व कार्पोरेशन ह्या नॉर्थ वेल्स्, फिलाडेलफिया, पेनीनसिल्वानिया स्थित अमेरिकेत स्थापित कंपनीचे संस्थापक सी.ई.ओ.ही आहेत.

आपल्या भारताच्या दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील त्रिची किंवा तीरुचीलापल्ली येथून परदेशी गेलेले असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे सितारामण नारायणन जें “अडोब” ह्या जागतिक कंपनीमध्ये ब-याच वरच्या हुद्द्यावर कार्यरत असून त्यांचे नाव “फोटोशॉप” हे सोफ्टवेअर उघडताना श्रेय नामावलीमध्ये प्रामुख्याने दिसून येत असते. अशी कित्येक उदाहरणे सापडतील की जी आपल्या घरापासून दूरवर गेल्यावर नावारूपाला आली आहेत.

तसेच जर आपण निवडलेल्या आई.टी. क्षेत्रामध्ये आपणास नावारूपाला यावयाचे असेल, तर आपणालाही ह्या क्षेत्रामधील आई.टी. हब असलेल्या (म्हणजेच पर्यायाने आय.टी.चे बॉलिवूड असणा-या, आय.टी.ची पंढरी असणा-या) चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, गुरगाव, पुणे येथेच किंवा परदेशामध्ये आपले नशीब अजमवावे लागेल, येथेच आपली प्रगती साधावी लागेल, येथेच आपल्याला आपल्या स्वबळावर नाव-लौकिक कमवावा लागेल, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनावे लागेल आणि मला वाटते आपण आणि आपल्या माता-पित्यांनी जो निर्णय काल घेतला होता तो खरोखरीच योग्य असा होता, आहेही आणि मला फक्त आशाच नाही तर पक्की खात्री आहे, तुम्ही लवकरच म्हणजे येत्या दोन-चार वर्षात तसा तो सिध्द कराल. फक्त त्यासाठी आपले मन थोडे खंबीर करा आणि कामाला लागा, जें तुम्ही लागलेलेच आहात, त्यामुळे तशी आशा आम्ही करावयास हरकत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..