नवीन लेखन...

माझी चेन्नई सफर

मी आतापर्यंत केलेल्या अभ्यासात मला एक गोष्ट आढळून आली ती ही की जो मनुष्य आपल्या घरापासून लांब असतो, तो लवकर प्रगती करतो. आपण विचाराल, हे कसे? तर त्याचे कारण असे की, जो आपल्या मुलामाणसात असतो, ज्याचे घर जवळपास असते, त्याला कामावर असताना वेळ झाली की घरी जाण्याची ओढ लागते व थोडा जरी उशीर झाला की तो नाराज होतो, रागावतो, आपल्या वरीष्टांशी भांडतो, त्यामुळे होते काय की आपल्या कामात तो जास्त वेळ देण्यास का-कु करतो, जास्त परिणामकारकरित्या कार्य करू शकत नाही, त्यामुळे त्याची त्याच्या कामातील प्रगती खुंटते, त्याचे सगळे लक्ष घरी जाण्याकडे असते, तर ह्याच्या उलट जो मनुष्य आपल्या घरापासून दूरवर परमुलखामध्ये असतो, त्याला त्याचे नातलग किंवा त्याचे घर जवळपास नसल्यामुळे ती ओढ राहत नाही, दुसरे असे की जेथे त्याने भाड्याने घर घेतले असेल तेथील ओढ ही आपल्या घराप्रमाणे नसल्यामुळे म्हणा किंवा अॅटचमेंट नसल्यामुळे म्हणा, किंवा खाण्यापिण्याची गैरसोय असल्यामुळे म्हणा तो जास्तीत जास्त वेळ-काळ आपल्या कामाच्या ठिकाणी देऊ शकतो, त्यामुळे होते काय की तो आपले जास्तीत जास्त लक्ष कामावर केंद्रित करू शकतो, कामासाठी जास्त वेळ देऊ शकतो, पर्यायाने आपल्या कामामुळे व वरिष्ठांच्या मर्जीमुळे आपली प्रगती लवकरात लवकर करून घेऊ शकतो. अशाप्रकारे तत्पर प्रगती होण्याचा त्याचा मार्ग खुला होऊन तो लवकरच वरच्या पदाला पोहोचतो आणि एकदा का तुम्ही वरवर जात राहिलात, तर तुम्हाला काय कमी आहे? तुम्हाला हवे ते मिळू शकते. फक्त तुम्ही आर्थिक दृष्टीने सबळ होणे महत्वाचे आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तुम्ही हे सर्वस्व आपल्या नित्यनियमित कामातून सगळ्यांना दाखवून द्याल. त्यासाठी तुम्हाला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावयास हवे आणि ते शक्य होईल फक्त वर उल्लेखिल्याप्रमाणे.

मग आता मला सांगा, हे आपल्या डोक्यातील मुंबई म्हणा, पुणे म्हणा, नागपूर म्हणा जाण्याचे जें खुळ शिरले आहे, ते काढून नको का टाकावयास? अशाने का आपली प्रगती होणार आहे? तुम्ही जितके आपल्या घराच्या ठिकाणी जवळ याल, तेवढे तुमचे तुमच्या कामातील लक्ष जास्त प्रमाणात विचलित होईल व तुम्ही प्रगतीपासून दूर जाल, ह्याच्या उलट तुम्ही जेवढे म्हणून तुमच्या घरापासून लांब राहाल, तेवढे तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी होण्याचे प्रमाण वाढेल. फक्त यावेळेस काळजी एवढीच घ्यावयाची ती म्हणजे वाईट संगत करावयाची नाही, वाईट गोष्टी करण्याचे टाळावे, ज्या ज्या काही अवैध गोष्टी आहेत त्या टाळल्या म्हणजे झाले. पहा तुम्ही कसे प्रगतीपथावर चालू लागता ते.

ह्याची बरीचशी उदाहरणे आपण आज आपल्या मुंबईतच पाहतो. बरेच लोकं आज आपल्या मुंबईत बिहार राज्यातून, उत्तरप्रदेशातून, दक्षिणेकडील राज्यातून, उत्तरेकडून पूर्वेकडून, पश्चिमेकडून मुंबईत दाखल झालेले आहेत आणि स्थानिकांपेक्षा अधिक यशस्वी झालेले आहेत. याचे कारण वर उल्लेखिल्याप्रमाणे त्यांच्याकडे असणारा अनिर्बंध वेळ, तसेच नातलग, भाऊ-बंद, यांच्या पाशापासून मुक्त असणारे त्यांचे जीवन. इतकेच नव्हे तर स्वत:च्या पोटाची, मीठ-भाकरीची त्यांना सतत असलेली काळजी. त्यामुळे होते काय की ही माणसे जास्तीत जास्त वेळ आपणा स्वत:ला आपल्या कामात गुंतवून घेतात व पर्यायाने यशस्वी होतात आणि आपण स्थानिक मात्र आहोत तेथेच राहतो.

दुसरे असे की, आज आपण भारतातच आहोत, परंतु घरापासून लांब आहोत म्हणून मनाला सारखे वाटते की आपल्या कार्यालयापासून आपले घर जवळ असते तर बरे झाले असते, आपली माणसे आपल्या जवळ असावीत आणि म्हणून मला मुंबईला जायचे आहे, मला पुण्याला जायचे आहे, मला नागपूरला जायचे आहे. परंतु विचार करा की समजा उद्या तुम्हाला भारताबाहेर पाठविण्यास तुमची कंपनी तयार झाली, तर त्यावेळेस देखील तुम्ही हेच म्हणणार काय की नाही मी भारताबाहेर जाणार नाही, मला आपली मुंबईच द्या किंवा पुणे द्या किंवा नागपूर द्या. मग मला सांगा अशावेळेस आपण सगळ्यांचा त्याग करून भारताबाहेर यु.एस.ए., यु.के.ला नाही का जाणार? अशावेळेस आपण म्हणणार का मला माझा देश सोडून नाही जायचे आहे.

अशावेळेस बाहेर जाणेच हिताचे ठरणार, त्यामुळेच आपली आर्थिक बाजू बळकट होणार आणि आपण आपले आपल्या जीवनात ठरविलेले ध्येय गाठू शकणार आहात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..