आपण ज्या कंपनीत काम करीत आहात त्या कंपनीला आशियायी देशांमध्ये “आय.टी. क्षेत्रातील कामगारांना ट्रेनिंग देणारी एक युनिवरसिटी आहे” असे मानले जाते. इथे फक्त ट्रेनिंगच दिले जात नाही तर त्याचबरोबर तुम्हाला भरघोस असा पगारही दिला जातो. त्यामुळे होते काय की आपण आर्थिकदृष्टया देखील सबळ होतो. भरघोस म्हणण्याचे कारण आपल्यासारख्याना इतर कंपन्यांपेक्षा येथे सुरुवातीला देण्यात येणारा पगार हा इतरांपेक्षा थोडा जास्तच असतो असे पाहण्यात आलेले आहे. त्याचबरोबर येथे देण्यात येणारी व्यावसायिक ट्रेनिंग देखील सखोल अशी सहा महिन्यांची असते. ह्या सहा महिन्यांच्या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांची राहण्याची देखील काही नाममात्र चारजेस् घेऊन कंपनीकडून सोय केली जाते.
जी मुले आज बी.ई. करून येथे आलेली आहेत त्यांचे पगार भरघोस देण्यामागेसुद्धा श्रीयुत नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी हीच कारणीभूत आहेत. पूर्वीची पारंपारिक पद्दत मोडीत काढून ह्या दोघा पती-पत्नीनी कामगारांना कंपनीच्या फायद्यामध्येसुद्धा सामावून घेण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे सर्वाथाने विचार करूनच ही कंपनी पुढे जात असताना, निश्चितच तिचे कामगारही आपल्या आयुष्यात उंची गाठ्णारच. असे असताना जी कंपनी आपल्या कामगारांच्या हिताचा नेहमीच विचार करते आहे, तिला सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्यात काय अर्थ आहे? का तर मला मुंबईला जायचे आहे म्हणून? की मला माझ्या घराजवळ जावयाचे आहे म्हणून? मी घराजवळ आल्यामुळे माझी प्रगती होणार आहे का? ह्या सगळ्या गोष्टींचा योग्य तो विचार करूनच पुढील निर्णय घेणे योग्य नाही का होणार?
इतर कंपन्यांमध्ये जावयाचे झाल्यास तेथील कार्यालयीन संस्कृती (ऑफिस कल्चर) कशी आहे, तेथील वातावरण कसे आहे, तेथील वरिष्ठ कसे आहेत वगैरे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेणे हिताचे ठरेल. घाई-गडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, कारण अशी संधी पुनः मिळणे नाही.
इतके करूनही जर कोणाला वाटत असेल की मला ही कंपनी सोडून माझ्या घराजवळील दुस-या कंपनीत भरती व्हायचे आहे, तर अशावेळी माझे तुम्हास सांगणे आहे की तुम्ही तेथील नोकरी स्वीकारण्याआधी तेथील सगळ्या गोष्टींची चौकशी करा, तेथील काम करीत असलेल्या कामगारांचे त्या कंपनीबद्दल असणारे मत विचारात घ्या, तेथील कामाचे स्वरूप लक्षात घ्या, तेथें देण्यात येणा-या पदोन्नतीबद्दल माहिती करून घ्या, तेथील इतर लाभांबद्दल माहिती घ्या, तेथें मिळणा-या आर्थिक लाभांबद्दल माहिती करून घ्या, इतकेच नव्हे तर तेथील कार्यालयीन संस्कृती पाहून मगच आपला निर्णय पक्का करा. घाई-गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. नाहीतर उगाचच पस्तावण्याची वेळ आपणावर येईल. त्याबरोबरच आत्ताची कंपनी सोडवायची असल्यास, सोडण्यापूर्वी वरील सगळे प्रकार पडताळून पाहिल्यानंतरच व स्वत:ची खात्री झाल्यानंतरच रितसर राजीनामा देवून ही कंपनी सोडून जा. पळपुटयासारखे पहिल्या कंपनीस न कळविताच व दुस-या कंपनीकडून ऑफर लेटर मिळाल्याशिवाय अगोदरची कंपनी सोडू नका. माझी आपणा सर्वस्वांस विनंती आहे की येती पांच वर्षे तरी ही कंपनी सोडू नका आणि जो काय निर्णय घेणार असाल तो पांच वर्षानंतरच घ्या.
तर मित्रानो, तुमचे, तुमच्या कुटुंबियांचे आणि माझे हे स्वप्न पुरे करणार ना?
अशाप्रकारे माझ्या चिरंजीवाना व त्याच्या मित्रांना समजावून सांगितल्यानंतर त्यांनी होकारार्थी माना डोलाविल्या. त्यामुळे येथे आल्याचे समाधान मिळाले. इतकेच नव्हे तर वेळीच आपणास सावध करण्याची संधी मिळाल्याबद्दल मन:पूर्वक धन्यता वाटली.
Leave a Reply