इंटरनेटच्या माध्यमातून आज मराठीतून काहितरी लिहीतांना खूप आनंद होतो आहे. आज सहजचं आपण डोळसपणे पाहिलं तर आपल्या एक लक्षात येइल की कुठेतरी आपण आपलं माणूसपण हरवतोय. समाजातून हळूहळू नितिमुल्य सुध्दा हरवतायत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊ पहातोय. याचाचं सुशिक्षीत मनाला खूप त्रास होतोय. पण आपल्याच षंढपणामूळे आपण काहिच करु शकत नाही याची जाणिव मनाला खूप अस्वस्थ करतेय. आणि मग कधीतरी लिहिलेली कविता तुमच्यापर्यंत पोहचवावीशी वाटतेय….
हे परमेश्वरा उंचंच उंच मन दिलंस,
आकाशाच्या क्षीतीजाला गवसणी घालणारं,
उदात्त आणि भव्यदिव्य स्वप्न बघणारं,
सामाजिक न्यायासाठी नेहमीचं झगडणारं.
हे परमेश्वरा अन्याय केलास माझ्यावर
या उंच मनाच्या साथीला पंख मात्र दुबळे दिलेस,
या दुबळ्या पंखांचे हात जोडून, अगतिक होउन,
एकचं मागणं तुझ्याकडे
मला वरदान दे दुबळ्या मनाचं.
मनंच माझं दुबळं असलं की त्यात भव्यदिव्य स्वप्न नसतील
क्षीतीजाला गवसणी घालण्याचं धाडस नसेल
न्याय आणि सत्यासाठी कुठचाही झगडा नसेल.
म्हणूनंचं सतंत सलणारं दुबळ्या पंखांचं आणि षंढपणाचं दुःखही नसेल.
— मिलिंद दातार
Leave a Reply