माझे सुख…… रुसले आहे माझ्यावर.
रुसून ते माझ्या नशिबाच्या डहाळीवर जाऊन बसले,
अबोला धरून……….
मी किती समजवले, तरी समजलेच नाही.
शेवटी न राहून, मी आपले-पणाचा हात पुढे केला,
तर ते भुर्रर्रर्रर्रकन उडून गेले…
माझ्या नशिबाच्या डहाळीचा झुला करुन गेले,
माझे सुख…….
——————-कवीता – जयेश मेस्त्रि————–
— जयेश मेस्त्री
Leave a Reply