माझ्यावरी प्रेम करते ती बहुतेक
माझी अशी ओढते ती री बहुतेक
हे बोलला आज मावळताना दिवस
लिहिशील ना गझल रात्री की बहुतेक
करतात ते रोज सुंदरता विद्रूप
त्याची अशी खोड आहे ही बहुतेक
माझ्या विरोधात गेले न्यायाधीश
माझ्याकडे बोट केले मी बहुतेक
रात्री अशी एक कळ उठली छातीत
मृत्यू तुझा गिरविला मी श्री बहुतेक
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply