आकाशाला भिडणारे प्रेम
आता कानाला भिडले
हृदयात शिरणारे प्रेम
मोबाईल मध्ये घुसले…
मला मोठे व्हायचे होते
पण फक्त तिच्या नजरेत
मोठा झालो मी जगासाठी
पण नालायक तिच्या नजरेत..
पण फक्त तिच्या नजरेत
मोठा झालो मी जगासाठी
पण नालायक तिच्या नजरेत..
माझ्या चारोळ्या वाचा
सहन करू नका
नाही आवडल्या तरी
छान म्हणू नका…
वाटत नाही कोणाला
मी प्रेमवेडा आहे…
कारण प्रेमाने मला
बोलताच येत नाही…
माझी कविता रोज
तरुण होत गेली
माझे तारुण्य रोज
थोडे चोरत गेली…
.
माझी कविता काळापलीकडे
कधीच जात नाही
तरी कोणतीच बंधने
काळाची जुमानत नाही…
माणसांच्या गर्दीत मला
कधीच हरवायचे नव्हते
गर्दीतला एक माणूस
कधीच व्हायचे नव्हते…
कधीच हरवायचे नव्हते
गर्दीतला एक माणूस
कधीच व्हायचे नव्हते…
भूत भविष्य आणि वर्तमान
आपल्या जागी स्थिर असते
मी बदलत गेलो वेड्यासारखा
ती मात्र तशीच असते…
आपल्या जागी स्थिर असते
मी बदलत गेलो वेड्यासारखा
ती मात्र तशीच असते…
का घाबरते का थरथरते
तुझे प्रेम माझ्या समोर
माझे प्रेमच वादळ होते
असता माझ्या तू समोर…
तुझे प्रेम माझ्या समोर
माझे प्रेमच वादळ होते
असता माझ्या तू समोर…
करोडो चांदण्या जरी नभात
असते एकच त्याच्या जवळी
माझ्या सभोवताली त्या असतात
मी असतो तुझ्या जवळी…
असते एकच त्याच्या जवळी
माझ्या सभोवताली त्या असतात
मी असतो तुझ्या जवळी…
फाटक्या कपड्यातून डोकावणारे
सौंदर्य पहावे लागते
फाटक्या हृदयातून सांडणारे
प्रेम जमवावे लागते…
सौंदर्य पहावे लागते
फाटक्या हृदयातून सांडणारे
प्रेम जमवावे लागते…
माझी प्रेमाची व्याख्या
फारच निराळी आहे
राधा- कृष्णाच्या अगदी
जवळ जाणारी आहे…
फारच निराळी आहे
राधा- कृष्णाच्या अगदी
जवळ जाणारी आहे…
आभाळ दाटून येते
आकाश निरभ्र असते
वासना दाटून येते
प्रेम निरभ्र असते…
आकाश निरभ्र असते
वासना दाटून येते
प्रेम निरभ्र असते…
मला घायाळ करण्यासाठी
शेवटी अस्त्र वापरले…
माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी तू
तुझे सौंदर्य खुलवले…
शेवटी अस्त्र वापरले…
माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी तू
तुझे सौंदर्य खुलवले…
© निलेश बामणे
Leave a Reply