नवीन लेखन...

माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील

माणसामधला देवमाणूस कर्मयोगी शिवशंकरजी पाटील शेगांव संस्थानचे प्रमुख आणि निःस्वार्थीपणे श्रध्दापूर्वक काम करणारे शिवशंकरभाऊ – शिवशंकरभाऊ म्हणजेच माणसामधला देवमाणूस आहे. त्यांना भेटल्याशिवाय ते कळणार नाही. श्री गजानन महाराज संस्थानचा भव्यपणा तिथली टापटिप व्यवस्था आणि निष्ठेने काम करणार्याची तनमयता तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. त्या मंदिरात सेवा करण्यासाठी हजारो प्रतिक्षा यादी आहे. भाऊंची ही कमाल आहे. तीन हजार सेवेकरी त्या मंदिराच्या परिसरात* तुम्हाला ते सगळे श्रध्देने काम करणारे आहेत. भाऊंनी हे परिवर्तन घडविले. संस्थानच्या कारभाराची सुत्रे भाऊंच्या हातात येण्यापुर्वी या संस्थानची वार्षिक उलाढाल पंचेचाळीस लाख रुपयांची होती. भाऊंनी ही उलाढाल आता १३७ कोटी रुपयापर्यंत आणली त्यातूनच महाराष्ट्रातले सर्वात्कृष्ठ इंजिनिअरिंग कॉलेज तिथे उभे राहिले. त्यातूनच आनंदसागर सारखे जागतिक किर्तीचा नंदनवन ठरेल, असा भव्य बगिचा उभा राहिला.

शब्दामध्ये वर्णन न करता येण्यासारखा काही विषय सांगून समजत नाही . ते प्रत्यक्ष पाहावे लागतात ऐकण्याचा आनंद वेगळाच. शिवशंकरभाऊ कोणालाही मुलाखत देत नाही. प्रसिद्धी त्यांना नको आहे. शरद पवारांसारखे जेष्ठ नेते भाऊंना माणतात. मला असे वाटते की, शरद पवार एकाच व्यक्तीला वाकुन नमस्कार करतात ते म्हणजे आमचे शिवशंकरभाऊ. अमेरिकेतल्या सिटी बॅंकेचे विक्रम पंडित हे गजानन महाराजांचे भक्त ते नेहमीच येतात. भाऊंचे काम पाहून ते असे थक्क झाले की त्यांनी भाऊंना सांगितले या सगळ्या प्रकल्पासाठी किती कोटी हवे तेवढे सांगा विक्रम पंडितांनी त्यांच्या बॅंकेमार्फत किती कोटी द्यावेत ? तब्बल ७०० कोटी, कोण येवढे पैसे देईल, देणार्याची दानत मोठी असेल, पण घेण्याराचा प्रामाणिकपणा आणि सचोटी माहीत असल्याशिवाय ऐवढी प्रचंड रक्कम कोणती बॅंक देऊ शकेल ? लिखापढी नाही, जमीन नाही , कोणती मालमत्ता बॅंकेकडे गहान नाही, आणि एक भक्त आपल्या बॅंकेचा ऐवढा प्रचंड पैसा भाऊंच्या विश्वासावर देतो. विक्रम पंडितांनी ७०० कोटी रुपये दिले. आमच्या विश्वस्त मंडळाने आराखडा तयार केला की किती पैसे लागतील याचा हिशोब केला किती पैसे परत फेडू शकू ते गणीत बसवले आणि अस ठरवलं की ७०० कोटी आपल्याला नकोत फक्त ७० कोटी रुपये घ्यायचे. महाराजांचा असा संदेश असायचा की गरजे पुरते घ्या आणि जे घ्याल ते परत करा. आम्ही विचार केला गरज ऎवढीच आहे . आणि फक्त ७० कोटी घेतले त्यांची परतफेड केली. गजानन महाराज यांच्या प्रेमापोटी विक्रम पंडितांनी ही रक्कम दिली, त्याचा विनियोग कुठेही चुकीचा होणार नाही, याची काळजी घेतली आणि म्हणूनच त्यांचा विश्वास बसला.

भाऊ म्हणाले मी कोणालाही मुलाखत देत नाही पद्मश्री, पद्मभूषण काही घेत नाही, शरद पवार म्हणाले मी शिफारस करतो. भाऊ म्हणाले अजिबात नको आणि शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे पण भाऊंना भेटायला आल्या होत्या त्यांनी काम पाहिले आणि थक्क झाल्या आनंदसागर बघून आल्या, इंजिनिअरिंग कॉलेज पाहिलं , सगळे प्रकल्प पाहिले अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाल्या, भाऊ तुम्हाला तर भारतरत्न दिले पाहिजे , भाऊ म्हणाले मला कशाला ज्यांना भारतरत्न मिळाली त्यातही काही मंडळी साबणाच्या जाहिराती करत आहात, अहो काय भावनेने तुम्हाला ऐवढा मोठा सम्मान दिला आणि तुम्ही काय करीत आहात ? मला कशाचीही हाव नाही, महाराजांनी सेवा करायला सांगीतली न बोलता सेवा करायची, मी संस्थानचे पाणी , चहा घेत नाही घरून पाणी घेऊन येतो. ही महाराजांची शिकवण आहे, आपण देण्यासाठी आहोत घेण्यासाठी नाही, त्यामुळे कसला लोभ नाही. आपण चेतन आहोत, कशाचा लोभ करायला हवा ? पैशाने माणसाची कधी किंमत होत नाही आणि तशी वस्तूने पण होत नाही, माणसाला नाचवणारी माया आहे, आणि मायेला नाचवणारी भक्ती आहे श्रध्दा आहेत, आम्ही माया स्वीकारत नाही, आम्ही श्रध्दा स्वीकारतो. ते सुत्र आम्ही पाळले. विक्रम पंडितांनी जेंव्हा ७०० कोटी रुपये देऊ केले तेव्हा त्यांना हे सांगितले जेवढे लागतील तेवढे घेऊ ७० कोटी घेतले, त्यांनी पण जाहिरात केली नाही, आणि आम्हीही जाहिरात केली नाही हा भक्तीचा व्यवहार आहे. लोक मला सांगत आहे भाऊ, आनंदसागर पाहण्याची फी ३०० रुपये करा लोक आनंदाने देतील , मी सांगितले नाही, अशा पध्दतीने पैसा मिळवायचा नाही आणि मिळाला तरी टिकायचा नाही आम्ही १५ रुपये ठेवली. आज १३७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहेत. त्यात १३ टक्के पैसे मानवसेवेवर खर्च करतो रुग्णालये आहेत , औषधे आहेत १० टक्के रक्कम बाजुला काढुन नवीन बांधकामासाठी ठेवतो.

भक्त निवास कशी बांधली आहेत बघा बाबा आमटे कुठेच जाऊन राहत नव्हते ते फक्त इथेच यायचे देऊळातही जात नाही म्हणायचे आपला उद्देश स्वच्छ असेल तर लोकांना तो समजतो, काम श्रध्देने करा, प्रामाणिकपणे करा, आमच्या शेगांव नगरपालिकेकडे पाणी योजनेला पैसे नव्हते शेगांव शहरात कमालीची अडचण स्वच्छ पाणी मिळेना, पंधरा दिवसांनी एकदा पाणी मिळायचे , नगर परिषदेचे अधिकारी पाटणकर माझ्याकडे आले, म्हणाले की पाणी योजना करायला केंद्र सरकार ४२ कोटी रुपये देत आहेत पण नगर परिषदेचा वाटा ७/८ कोटी रुपये द्यायलाही पालिकेकडे पैसा नाही, काय करायचे ? मी म्हटले चिंता करू नका. संस्थानच्या सर्व विश्वस्थांना सांगून त्यांच्या मान्यतेने नगर परिषदेला हवे असलेले ७ कोटी ७७ लाख रुपये आम्ही देऊन टाकले, महाराजांच्या आदेशानेच हे केले, आज शेगांवला जे पाणी मिळत आहे त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर समाधान आहे. आया – बहिणीचे कष्ट वाचले आहेत त्यांच्या समाधानात आम्ही आमचे समाधान मानतो, तुम्ही त्याला नाव द्या सामाजिक बांधीलकी आम्ही म्हणतो आमचे कर्तव्य .

Avatar
About विजय लिमये 49 Articles
श्री विजय लिमये हे नागपूर येथील Eco friendly Living Foundation चे अध्यक्ष आहेत. ते पर्यावरण या विषयावर जनजागृती करत असतात आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..