नवीन लेखन...

माणसा किती रे तुझा स्वार्थ

एकदा एक वाघ आणि वाघीण पिलांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. २ दिवस पर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिलांना खूप भूक लागली.
कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिलांना आपले दूध पाजले. पिलांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली.

तेव्हड्यात तिथे ७ दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याच्या आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिले म्हणाली. आई-बाबा या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केलेय. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका.

पिलांचे ऐकून वाघ खुश झाला आणि तिला कृतज्ञतेने म्हणाला. आम्ही तुझे हे उपकार विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदाने जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कुणीही तुला त्रास देणार नाही. याची मी ग्वाही देतो. तेव्हा पासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदी पणे कुठेही फिरू लागली.

एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडांची पाने खातांना एका कबुत्तराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्ल विचारले.
बकरीने त्या मोठ्या पक्षाला सर्व हकीकत सांगितली. उपकाराचे महत्व कबुत्तराच्या लक्षात आले.

आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुत्तराने मनातल्या मनात ठरवले.

एकदा कबुत्तर उडत असतांना त्याला काही उंदराची पिले दलदलीत फसलेली दृष्टीस पडतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबुत्तर त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिले ओली झालेली असतात. थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात बऱ्याच वेळ चांगली ऊब घेतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्या कडे जाण्यासाठी कबुत्तर उंदराच्या पिलांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या त्याला उडता येईना… तो अस्वस्थ झाला आणि त्याने त्याचे कारण शोधले…!

“उंदराच्या पिल्लांनी ऊब घेता घेता कबुत्तराचे संपूर्ण पंख कुर्तडलेले होते.”

फडफडत फडफडत कसाबसा कबुत्तर तेथून बकरी पर्यंत पोहचले आणि त्याने बकरीला विचारले…,

“तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकारच केले. पण दोघांना वेगवेगळे फळ अर्थात अनुभव कसे मिळाले?”

बकरी हंसली आणि गंभीरपणे म्हणाली…

“उपकार कधीही वाघा सारख्या पुरुषी व्यक्तिमत्वावर करावेत, उंदरा सारख्या स्वार्थीवर नाहीत.

कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरिता दूसरा पर्याय शोधात असतात… स्वतःचा स्वार्थ साधला कि ते सच्च्या व प्रमाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात.

मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात”

प्रा. हितेशकुमार पटले
About प्रा. हितेशकुमार पटले 17 Articles
प्रा. हितेशकुमार पटले हे स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक असून ते लेखकही आहेत. ते सोशल मिडियावर कार्यरत असून स्पर्धा परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..