जेष्ठ गायिका माणिक वर्मांचा जन्म १६ मे १९२६ रोजी झाला. त्यांची आज पुण्यतिथी, १० नोव्हेंबर.
माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच, किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला…(गाणं -घन निळा लडीवाळा…) किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या कोंदणाने सजलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मायांनीदेखिल गायलीयत. मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी संगीत शिकल्या. या स्वर्गीय सुरांच्या साथीने संगीतालं एक सुरेल पर्व सुरू झालं. अखंड संगीताचा ध्यास घेतलेल्या माणिक वर्मा यांची संगीतिक कारकिर्दी फुलली ती घरातच. माणिक ताईंच्या आईने त्यांचं गाणं ख-या अर्थाने विकसित केलं आणि मग त्यांच्या आयुष्याचचं सुंदर गाणं झालं. तसंच अनेक संगीतदिग्गजांकडे संगीताचे धडे घेत आणि किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीत, भक्तिगीत, नाट्यगीत आणि चित्रपटगीतांना स्वरसाज चढवला. किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वत: ची स्वतंत्र शैली निर्माण केली. ग. दि. माडगुळकर यांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या कोंदणाने सजलेल्या गीतरामायणातील काही गाणी माणिक वर्मा यांनी देखिल गायलीयत माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट-अभिनेत्री भारती आचरेकर व नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या कन्या होत. गायिका सुनीता खाडिलकर या माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी. रंगशारदा महोत्सव योजनेअंतर्गत १९९८ सालापासून तीन दिवसांचा माणिक वर्मा संगीत महोत्सव साजरा होतो. माणिक वर्मा यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. माणिक वर्मा यांच्या स्वरांचा सन्मान पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, यांसारख्या पुरस्कारांनी करण्यात आलाय. माणिक वर्मा यांनी आयुष्यभर सुरेल आराधना केली आणि त्यांचा हा स्वर अमृताहूनी गोड असाच होता, आहे आणि रसिकांच्या हृदयात चिरंतन राहिल. माणिक वर्मा यांचे १० नोव्हेंबर १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माणिक वर्मा यांची काही गाणी
घन निळा लडीवाळा
शरदाचे चांदणे मधुवनी
नका विचारु देव कसा
अमृताहुनी गोड
विजयपताका श्रीरामाची
डोईवरी पाण्याचा ग माठ
गोकुळीचा राजा माझा
रंगले का घेऊनी
Leave a Reply