नवीन लेखन...

मानसिक तणाव- (क्रमशः पुढे ३ वर चालू-)

एखादा पाच किलो वजन घेवून काही अंतर चालतो. त्याचे हात दुखू लागतात. त्याला दम लागतो. थकवा वाटू लागतो. कारण तो त्या त्या अवयवावर तान देत असतो.आणि ती अवयवे तसे दर्शवितात.मात्र मेंदूमध्ये प्रचंड वैचारीक क्षमता असते. त्यामुळे तुमच्या मेंदूला क्षिणता आली हे लगेच होत नसते. मात्र क्षिण झालेला मेंदू ( Fatigued Brain) त्याचे परिणाम इतरत्र पसरवून इतर अवयवावर परिणाम करतो. त्यालाच ‘ मानसिक तणाव ‘ म्हणता येईल.

आजकालचे वैद्यकिय शास्त्र तर असे म्हणते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मूळ हे मानसिक तणावातून उत्पन्न होते. ज्या वेळी त्याच्या म्हणजे उत्पन्न झालेल्या विचार लहरी जशा जशा त्या त्या अवयवावर आघात करतात, ते ते अवयव त्या त्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला दाखवतात. मग ह्रदय विकार, रक्तदाब डायबेटीस, किडनीचे विकार, डोळ्या, कानाचे विकार वा आतड्यांचे विकार असोत, सर्वांचा केंद्रबिंदू शेवटी वैचारीक जडन-घडनापर्यंत जावून पोहचतो. अर्थात मेंदूचे आपले विकार ह्यातून सूटलेले नाहीत. म्हणून मानसिक तणावाला फार महत्व आसते.

मन हे शरीराच्या निरनीरीळ्या अवयांवर कशाप्रकारे परिणाम करते व त्या अवयवाला व्याधीगृस्त बनविते हे आपण आता बघणार आहोत.

भरकटणारे आणि अशांत विचारांचे वादळ मेंदूला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक काम करण्यास भाग पाडते. मेंदू थकून जातो. क्षिणता भासते. Fatigue Sense येतो. बेचैनी अवस्था वाढते. आपण त्याला कस् कस् वाटते असे म्हणतो. कुणी त्याला कंटाळा आला म्हणतात. कुणाला ताप आला वाटते. पण ताप मोजता ताप Normal असतो. दिवस कसा सुना सुना निरुच्छाही वाटतो. हे सारे मनाचे मेंदूवर होणारे आघांत. कोणतेही देहकार्य चालते ते उर्जा शक्तिवर. मेंदूवर पडत असलेला मनाचा वाढता तणाव हा देखील मेंदूसाठी जादा उर्जाशक्तीची मागणी करतो. उर्जेचा स्रोत हवा, पाणी, व अन्न ह्या नैसर्गिक घटक पदार्थामध्ये असतो. हे सारे बाहेरुन मिळणारे पदार्थ निरनीराळ्या अवयवामार्फत रक्तात जमा होतात. रक्ताच्या माध्यमातून शरीराला त्याचा पुरवठा होत असतो. मागणी त्याप्रमाणे पुरवठा हे तत्व शरीराला देखील लागू पडते. मेंदूच्या वाढत्या उर्जा मागणीमुळे ह्रदय, फुफूस, आतडी, किडणी, ह्या सर्व अवयवावर ताण पडू लागतो. अर्थात कालांतरानंतर त्या त्या प्रकारचे परिणाम व्यक्त होऊ लागतात. रक्त दाब, डायबेटीस, डोळ्याचे विकार, किडणीचा त्रास, अशी अनेक व्याधी मानसिक तणावामुळे उत्पन्न होतात. वैद्यकिय शास्त्र तर सांगते की जवळ जवळ सर्वच रोगाचे मुळ हे मानसिक तणावांत असते. तणावामुळे अवयव अशक्त बनत जातात. बाहेरुन होणारे आजार हे देखील अशा पिढागृस्त अवयवावरच आघांत करतात. सर्वांचे मुळ असते मानसिक तणाव. काही दिवसापूर्वी फिरण्यास गेलो असताना बस स्टँड जवळून जात होतो. माझे एक मित्र एकनाथराव ह्यांची भेट झाली. ते आपली छोटी ब्रिफकेस कुठेतरी गावाला जाण्याच्या गडबडीमध्ये होते.

” काय गडबडीत आहात? ”

”हो मी जरा नाशिकला जावून येतो. संध्याकाळीच परत येईन. एका यात्रेसाठी देव दर्शनाला जावून येतो ”

बस स्टँडवर प्रवाश्यांची प्रचंड गर्दी होती. अनेक बसेसची ये-जा चालू होती. मी तसा रीकामाच होतो.त्यांना साथ देत त्यांची गाडी येई पर्यंत गप्पा मारीत उभा होतो. गाडी आली, स्टँडवर लागली. सर्व प्रवासी गर्दी करुन गाडीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करु लागली. तुफान गर्दी. सर्वांची धावपळ जागा पकडण्यासाठी व दारामधून आत शिरण्यासाठी. माझे मित्र एकनाथराव देखील धावून त्या गर्दीत सामील झाले. लोक एकमेकावर तुटून पडले होते. आत शिरण्याची सर्वांची एकच गर्दी. एकनाथराव दारापर्यंत गेले, दारात कन्डक्टर (वाहक) होता. धक्का बुक्कीला तोंड देत ते तिथ पर्यंत गेले. तेथूनच ते ओरडले,
” कन्डक्टर माझे रिझरव्हेशन आहे. ११ नंबरची माझी जागा आहे. मला आत येवू द्या. ”

मी सर्व गडबड, प्रवाश्यांची गर्दी धावपळ बघत होतो. एकनाथरावांचे मी देखील ऐकले. मी लगेच पूढे गेलो व त्यांचा हात पकडून मागे येण्याची सूचना केली.

ते ” का? ” म्हणून म्हणाले. परंतू मी त्यांना त्या प्रचंड गर्दीतून बाहेर काढले. ” अहो येवढी प्रचंड गर्दी, गोंधळ आहे, तुम्ही इजा करुन बसाल. तुमच्या जवळ रिझरव्हेशन आहे ना? मग तुम्हीपण त्या गर्दीत का जात आहात.

बघा हा मानवी स्वभावाचा एक नमुना . एकनाथरावांचे रिझरव्हेशन आहे. त्यांना बसण्यासाठी जागा निश्चीतच दिली जाणार. परंतु कित्येकजण धावपळ करीत, गडबड करीत आपल्या ठरलेल्या जागेपर्यंत जाणार, सिटवर बसणार किंवा सामान पिशवी ठेवणार, मगच त्याना समाधान वाटते, शांतता वाटते. एकदा जागा मिळवली की बस ठिक झाले, ही त्यांची धारणा. जागा आरक्षीत केलेली असताना हे महत्वाचे. इतर प्रसंगी असे असू शकेल. मानसीक तणावाखाली राहणारी ही माणस एखादी गोष्ट मिळवणे, मिळणे त्यासाठीचे प्रयत्न समजने योग्य. परंतू ती गोष्ट जर तुम्हाला निश्चीतच मिळत असेल तर मग धडपड कशासाठी.

एक दुसरे उदाहरण देतो, माझा मित्र डॉक्टर सदानंद लिमये. आम्ही १२ वीत म्हणजे Premedical च्या वेळी तो संपूर्ण राज्यात प्रथम आला होता. कौतुक, बक्षीसे झाली. कॉलेजसाठीच्या प्रवेश पत्रीका भरल्या. सर्वांत प्रथम येणारा म्हणजे वैद्यकीय विद्यालयात जागा मिळणार, ह्यात थोडी देखील शंका नव्हती. ते त्याने केले परंतू त्याच बरोबर साधा B.SC ह्या विषयाचा फॉम भरुन एका सायन्स कॉलेज मध्ये देखील फॉम भरला. आपली प्रवेशाची निश्चीती माहीत असून देखील अशाच पध्दती प्रमाणे अनेक विद्यार्थी निरनिराळ्या शाखामध्ये प्रवेश घेवून ठेवतात. प्रसंगी फी भरुन देखील. विशेष गंमत म्हणजे त्या वेळच्या पध्दतीनुसार जे १० विद्यार्थी प्रथम क्रमांकात उत्तीर्ण होत असत, त्यांना काही वैद्यकीय वा इंजिनीयरींग कॉलेज शुभेच्छा देवून त्या हूशार विद्यार्थांनी त्यांच्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यावा हे कळवीले जात असे. सदानंद यालापण हे भाग्य लाभले. म्हणजे इतकी निश्चिती असून देखील त्याने साध्या सायन्स मार्गासाठीदेखील अर्ज भरला होता.

संशय,भिती, अनिश्चीतता हे भावनीक गुणधर्म मानसिक तणाव निर्माण करतात. जे स्वभावाने प्रत्येक गोष्टीत सांशक असतात त्यांना आत्मविश्वास कमी वाटतो. अशाच स्वभावाच माणसे मानसिक तणावाचे बळी पडतात.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

e-mail bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..