नवीन लेखन...

मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

 

यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा.

जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात.

तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष नव्हेत. परंतु तुम्ही जर समजदारीची भूमिका घेतली तर येवू घातलेल्या मानसिक तणावाच्या चक्रातून जाण्याचे टाळू शकतो. प्रत्येक प्रश्नाचे संघर्ष हे उत्तर नसत. कोणत्या घटनेला किती प्राधान्य द्यायच, त्यांत किती तिवृतेने स्वतःला गुंतवून ठेवायच ह्याचा तुम्ही शांततेने विचार करु शकतां. काहीं व्यक्तीतर वर्षानुवर्षे सुडाच्या वातावरणात, अहंकाराच्या चकरामध्ये आपले आयुष्य घालवितात. ही आमच्या घराण्याची दुष्मनी आहे, अशी दर्पोक्ती करण्यात त्याना धन्यता वाटते. आयुष्य कशासाठी व किती असते हाच मुळ प्रश्न ते जाणत नाही. व्यवहारिक दृष्टीने असल्या संघर्षामधून काहींही उत्पन्न होत नसते. फक्त Ego, मीपणा, अहंभाव, याना खतपाणी देण्यातच त्यांच जीवन खर्च होत. ही एक वृत्ती बनते. हा स्वभाव घातक तर ठरतोच पण मानसिक तणावाला कारणीभूत ठरतो. काय करावे ह्या यातना देणारय़ा संबंधी. चिंतन करा, विचार करा, कांही मार्ग सुचतो कां हे बघा. वेगळ्या वातावरणाची निर्मिती करा. क्षमा याचनेचा विचार करा आणि जर अत्यंत कठीण व अशक्य वाटत असेल तर अशांच्या सहवासातून स्वतःबाजूस व्हा. संपर्क टाळा. अशा व्यक्तीना विसरुन जाण्याचा प्रयत्न करा.

हे मी फक्त ठोकताळे सांगतो. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटना, आणि सहवासामधली जवळीक ही भिन्न असू शकते. परिस्थितीजन्य उपाय योजना ह्या तुम्हालाच घ्यावयाच्या असतात. जे कराल ते शांततेने व शांततेसाठीच असावे. मानसिक तणावाला प्राधान्य देत.

सृष्टी एकविशाल नाटक- एक रंगभूमी

अस म्हणतात की हे जग, ही सृष्टी, एकविशाल नाटक आहे. एक रंगभूमी आहे.आणि आपण सर्वजण कलाकार आहोत. प्रत्येकाची भूमिका वेगळी व स्वतंत्र असते. कुणाचीही भूमिका एक सारखी नसते. भिन्नता आणि तरीही त्या त्या भूमिकेतील वैशिष्ठपूर्णता, हाच निसर्गाचा चमत्कार असतो.

एखाद्या नाटकांत कुणी राजाची भूमिका करतो तर कुणी भिकारय़ाची.त्या भूमिका ते कशी वठवतात, ह्यावरच त्या कलाकाराचे यश असते. जीवनाच्या ह्या रंगभूमिवर देखील प्रत्येकाने ज्याच्या नशिबी जी भूमिका आलेली असेल ती तशीच हूबेहूब करणे, हे अपेक्षित असते.

नाटकांत देखील भिकारी आपल्या कर्तृत्वाने, हिमतीने राजा बनू शकतो. तसाच राजा आपल्याच दुर्गुणाने, मुर्खपणाने राज्यपद गमावतो, भिकारी बनतो. हे सत्य आपण बघतो. जीवनाच्या लढ्यात, संघर्षात देखील क्षमता, योग्यता, कर्तृत्व, हिम्मत याना मोठे स्थान असते.

मानसिक तणाव येतो कोठे ?

ज्यावेळी अशी माणसे स्वतःमधील क्षमता, योग्यता विसरतात. कसलेही प्रयत्न करीत नसतात. केवळ इच्छेने, विचाराने इतरांच्या यशाबद्दल कल्पना करतात. मला हे ईश्वराने कां दिले नाही ? याची तक्रार करतात. परिस्थितीला, वातावरणाला बोल लावतात. अशांचे जसे स्वभाव गुणधर्म तयार होतात, त्याला मानसिक तणावामध्ये ढकलतात. दुसर्‍याचे शेत अशाना नेहमी हिरवेगार वाटत असते. आपल शेत देखील कसे हिरवेगार करता येइल, ह्याचा ते प्रयत्न ते करीत नसतात.

अशांच्या स्वभावात निर्माण झालेली वैचारीक ठेवण, त्याना सतत विचारांमध्ये लोटते. तेच मानसिक तणावग्रस्त होतात. जीवनाच्या ह्या रंगभूमिवर, इतर भूमिकांचा अवास्तव विचार न करता, जो आपली स्वतःची अपेक्षीत भूमिका चांगली वठवतो, तोच जीवनात यशस्वी होतो. हीच मानसे तणावरहीत जीवन जगू शकतात. एक मित्र आहे. त्याच दुकान आहे. खूप मेहनत करतो. व्यवसायांत चांगली कमाई करतो. परंतु जे त्याला मिळत, त्यात सदैव निराश असतो. तो बघ कंपनीत नोकर आहे, बस महीना संपला की हाती पगार. तो Contractor आहे. एखादे काम केले की भरपूर पैसे. माझ्या कामासारखी रोजची आणि सतत किच किच नाही. प्रत्येक अभिनेता आपला श्रेष्ठ अभिनय सादर करीत असतो. म्हणून कोणाच्याही अभिनयाला पाहून चिंतीत होऊ नका.

क्रमशः पुढे ८ वर चालू

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..