(आयटी कंपन्यात अंतर्गत राजकारण खेळतांना सहजासहजी कोणी दिसत नाही. सगळेजण आपापल्या कामात इतके मग्न असतात की इतर चर्चा करण्यात वेळच नसतो. यामुळे कामावर एकाग्रता होते व काम अधिक चांगले होते. त्याचा फायदा महिलांना अधिक होतो. महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. ज्याच काम चांगल त्याला अधिक फायदे मिळतात.)
1980 पासून खरतर भारत देशात झपाट्याने माहिती तंत्रज्ञानाने प्रगती करण्यास सुरूवात केली आहे. या आधी रेडोओ, टेलिव्हिजनच्या माध्यमातून जगातील बरीच माहिती आझ्फऱ्णसिमळवित होतो. पण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे नवनवीन माहितीची कवाडे आपणास खुली झाली व जग एक खेड बनले. काळाच्या ओघात कॉम्प्युटर आणि मोबाईल यांचा युवा वर्गात नवीन उगम झाला. युवा वर्गात शिकलेल्यांना डॉक्टरकी आणि इंजिनिअरींग या व्यतिरिक्त वेगवेगळे पर्याय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे उपलब्ध झाले. यात पुरुषांच्या बरोबर महिलांना समान संदी मिळाली. व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची नवनवीन कवाडे खुली झाली.
1990 पासून भारतात रोजगार क्षेत्रात क्रांती झाली असं म्हंटल वावगं ठरणार नाही. कारण माहिती तंत्रज्ञानातील मोठ्या कंपन्या भारतात परदेसी गुंतवणूक करू लागल्या. टी. सी. एस., विप्रो, इन्फोसिस, आदी सारख्या कंपन्या झपाट्याने भारतात वाढू लागल्या. यामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, हार्डवेअर वर्किंग यासाठी भारतातील युवा वर्ग मुलं, मुली यांच्या हुशारीला बाहेरच्या जगात वाव मिळण्यास सुरूवात झाली. डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट घेऊन वेगवेगळ्या आयटी कंपन्या भारतात मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या. त्यांनी उत्तम प्रकारे भारतात स्वत:चा तळ ठोकला व रोजगाराची संधी प्राप्त केली. यामध्ये पुरूषांबरोबर महिलाही समाविष्ट होत्या.
माहिती तंत्रज्ञान कामाला नो लिमिट अशंच म्हणाव लागेल. त्यामुळे येथे ज्याचे चांगले काम त्यास चांगले दाम ही म्हण एकप्रकारे रुजु झाली. बुध्दीला जास्तीत जास्त किंमत मिळू लागली. यामध्ये महिलांना फायदे होवू लागले. 10,12, ग्रॅज्युएट महिलांना हे क्षेत्र नोकरीसाठी पर्वणीच ठरली. अगदी हिंदी, मराठी टायपिंगच्या कामापासून सुरुवात करत सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, हार्डवेअर नेटवर्किंग, जी.आर. पी. अॅप्लिकेशन सिसिस्ट डेव्हलपर्स इथपर्यंत क्षेत्र खुले झाले. आयटी आणि आयटीएस यामुळे उद्योग क्षेत्रात महिलांचा मुक्तपणे संचार होऊ लागला.
अनंत आमुची ध्येयासक्ती म्हणत महिलांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व बाजू आज पादाक्रांत केल्या आहेत.
प्रत्येक क्षेत्र म्हंटल तरी त्यात काम करीत असणार्या महिलांना मिळणारे फायदे आणि तोटे यांचा आपण नक्कीच विचार केला पाहिजे.
हा लेख लिहित असतांना खरतर मी मला आलेल्या अनुभवाबद्दल सांगणार आहे. मी स्वत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एका नामवंत कंपनीत मी मॅनेजर म्हणून काम करीत आहे. गेली दहा वर्ष हा प्रवास सुरू आहे. बर्याच वेळा मला लोक विचारतात, की एवढी वर्ष एकाच कंपनीत कशी काय काढलीत? खर सांगायच तर या क्षेत्रात महिलांना एकदा संधी मिळाली की त्यांना मागे वळून बघायला वेळ मिळत नाही. इथल्या अनेक एम्पलॉईजच म्हणणं असं आहे की आम्ही महिलांना नोकरीत प्राधान्य देतो कारण त्या कामात चोख असतात. आयटी कंपन्यात अंतर्गत राजकारण खेळतांना सहजासहजी कोणी दिसत नाही. सगळेजण आपापल्या कामात इतके मग्न असतात की इतर चर्चा करण्यात वेळच नसतो. यामुळे कामावर एकाग्रता होते व काम अधिक चांगले होते. त्याचा फायदा महिलांना अधिक होतो. महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नाही. ज्याच काम चांगल त्याला अधिक फायदे मिळतात.
महिलांची काळजी घेणार क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहिल जाते. या क्षेत्रातील महिला स्वत: का अधिक सुरिक्षत मानतात. स्वत:ला व कुटुंबाला सांभाळत महिला सहजपणे या क्षेत्रात वावरु शकतात. कधी कधी कामाचा व्याप खूप असल्यामुळे रात्री उशीर होतो. परंतु प्रत्येक महिलेला तिची स्वत:ची सुरक्षतिता देणे तिच्या कंपनी पर्यंत तिला पोहोचविणे हे प्रत्येक कंपनीचा काम असते. एवढ्या महिलांच्या सुरिक्षततेची काळजी इतर कुठल्या क्षेत्रात घेतली जाते अस मला वाटत नाही. इथ कंपनीमध्ये वातावरण खेळिमेळीच असतं जणू काही दुसर कुटुंबच अवतरल असा भास होतो. इथ कंपनीतला टीम लिडर इतक्या आस्थेने सर्वांची विचारपूस करीत असतो की तो एक घरातीलच कुटुंबप्रमुख आहे की काय असा भास होतो. कंपन्यांमध्ये असणार्या महिलांच्या कामाच्या वेळा अत्यंत सोईस्कार असतात त्यामुळे घर सांभाळून काम करता येते.
याची दुसरी बाजू ही बघण्यासारखे आहे. कधी कधी कामाच्या वेळा अत्यंत गैरसोयीच्या असतात, घरातून लवकर निघावे लागते, कधी परतण्यास उशीर होतो. काम संपवण भाग पडत अशा वेळी महिलांची धावपळ होते. घरातील सणवार, मुल सांभाळुन स्त्रिया जेव्हा कंपन्यांमध्ये काम करतात व रात्री उशीरा परतातत तेव्हा त्यांची तारेवरची कसरत पहावत नाही. कधी कधी सातत्याने संगणक यांच्या वापरामुळे शारिरीक व मानसिक ताण पण येतो. आजार उदभवू शकतात.
याचे सर्व फायदे व तोटे मधील तात्पर्य हे क्षेत्र महिलांना सक्षम बनवणारे आहे काही तोटे असले तरीसुध्दा हे क्षेत्र महिलांना अत्यंत सुरिक्षत,सक्षम, स्वकर्तृत्ववान बनण्याची संधी प्राप्त करुन देते. या क्षेत्रात बुध्दीचा वापर व सह कर्मचार्यांशी असलेला संपर्क हेच आपल्या कामाच प्रतिक आहे. इतर कामातील वायफळ चकाट्या पिटण्यापेक्षा टेलिव्हिजन वरील त्याच त्याच मालिका पाहण्यापेक्षा महिलांनी या क्षेत्रात येऊन येथील क्रांतीचा वापर स्वत:च्या विकासासाठी करत कुटुंब व देशाचे स्वास्थ टिकवणे हे आजच्या महिलाचे परम कर्तव्य आहे. कारण ज्या देशातील महिला सक्षम जागरुक असेल तोच देश सर्व शक्तिमान होऊ शकतो.
दिव्या ढोले, मुंबई.
(सौजन्य – “पंढरी प्रहार”)
— दिव्या ढोले
Leave a Reply