साहित्य:
दोन वाट्या तांदळाचा रवा
चार वाट्या उडीद डाळ
१ वाटी हरभरा डाळ
३ ते ४ हिरव्या मिरच्या
१/२ इंच आल्याचा तुकडा
८-१० मिरी दाणे
४-५ चुरडून घेतलेली कडिपत्त्याची पाने
कृती:
उडीद व हरभरा डाळ चांगली निवडून घ्यावी. स्वतंत्रपणे ४ ते ५ तास भिजवत ठेवावी. नंतर उपसावी. स्वतंत्रपणे दोन्ही डाळींची भरड वाटून मग उडीद पिठात तांदळाचा रवा, हरभरा वाटण व मिरच्या, मिरी व आले वाटण घालावे. कढीपत्ता घालावा. चांगले घोटून घ्यावे व पाणी घालून पीठ मध्यम जाड करुन इडल्या तयार कराव्यात. या इडल्या आपण हिरव्या चटणीबरोबर किंवा सांबार बरोबर सर्व्ह करु शकता. या तयार झालेल्या पिठाच्या तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशीही इडल्या करु शकता.
— सौ.कविता पाटील
Leave a Reply