कळले नाही तुला माझे प्रेम, ओथंबलेले मन !!
आज या वाटेवर थबकलेली माझी पाऊले
माझ्या वेडया प्रेमाची साक्ष देतात
आणि माझी नाती कृष्णवेड्या मीरेशी जुळून जातात
तिचे प्रेम त्या वेडया माधवाला कधी कळेलच नाही
राधेत हरवून जाताना त्याने तिला पाहीलेच नाही
तू ही का रे असा त्या सावळ्या हरीसारखा
का दुर्लक्षलेस मला काय होता गुन्हा माझा
मी तुझ्या प्रेमात पुरती झपाटून गेले
आणि हे प्रेम वेड बनल्यावर तू मला नाकारलेस
माहितेय तुला….आवरलंय मी माझ्या भावनांना आता !
पण सावरत मात्र नाही मी यातून आणि सावरायचे नाही
आहे मला कारण माझे नाते मीरेशी आहे ना…. ती प्रेमदिवाणी
तिच्या प्रेमाकरता विषाचा प्याला प्यायला निघाली
आणि तेव्हा कुठे किशनला तिची आठवण झाली
तो विषाचा प्याला अमृत बनला तिच्या अमर्याद प्रेमामुळे
असेच काहीसे प्रेम माझे तुझ्यावरही आहे त्याला मीरेच्या
प्रेमाची सर येणार नाही पण सूर मात्र तसाच काहीसा जुळलेला राहील ………
असाच विषाचा प्याला मी एक दिवस पीईन आणि
तेव्हा तुला माझी आठवण होईल
माझा प्याला अमृत नाही झाला तरीही चालेल
पण माझा शेवटचा श्वास, त्याची एक इच्छा तू पूर्ण कर
हे जग सोडून जाताना तू माझा हात तुझ्या हाती गच्च मिटून धर
अनिमिष नेत्रांनी माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न कर आणि अगदी
जमलेच तर ! माझ्यासाठी खोटेखोटे रड….
तुझे ते अश्रू मी माझ्या मिटत्या पापण्यांत साठवून घेईन
आणि हे जग सोडताना अखेर पावन होईन
मीरेसारखी……..
— कुमारी.अंकिता महेंद्र पाटील उर्फ अंकिता
Leave a Reply