नवीन लेखन...

मी हे करीत नव्हतो

चार वर्षानंतर माझी मुलगी माहेरी आली होती. व्यवसायात व्यस्त असल्यामुळे तीला येणे जमले नव्हते. माझ्या नातीला म्हणजे तीच्या मुलीला घेऊन ती येणार असल्यामुळे, आम्ही सर्वजण उत्सुक होतो. मी आरामखुर्चीवर बसून त्यांची वाट बघत होतो. बेल वाजली. त्या दोघी सामानासहीत आल्या. नातीने आत येताच माझ्याकडे कटाक्ष टाकून ” हाय ” म्हणत स्मित केले व ती आत बाथरुममध्ये गेली. हात पाय धुऊन Fresh झाली व बाहेर आली. ” हाय आजोबा ” म्हणत माझ्या जवळ आली. आपला हात पुढे करीत शेक हँड करण्याची इच्छा प्रदर्शीत केली. मी मनांत थोडासा निराशलो होतो. तीने येताच पाया पडावे व माझा आशिर्वाद घ्यावा ही मनातील इच्छा. पण कसचे काय ? ती इतक्या वेगाने आली व मला भिडली की मला तीच्या शेक हँडला प्रतिउत्तर देत स्वागत करावे लागले. ती बराच वेळ माझा हात धरुन हालवित राहीली. मग तीने माझ्या कपाळाचे चुंबन घेतले व चक्क गळ्यात पडली. ” Oh my great grand-pa- आजोबा. माझेच दोन्ही दंड हाताने धरीत म्हणाली. कसे आहात आजोबा. Health is OK आहे ना ? आहो Be active आणि Smart. माणसाने कसे टवटवित असाव आणि दिसाव. You have to reach the Century of life man. आणि ती मोठ्याने हासली. नंतर ती मजकडे मिश्किलतेने पहात राहीली.

तीच वागण माझ्या मनासारख, माझ्या कल्पनेप्रमाणे नव्हत. म्हणून ते माझ्या पचनी पडत नव्हते. परंतु ते जास्त प्रेमदर्शक, आपूलकीचे, आणि मनावर सुखकारक घावघालणारे मात्र होते. माझ्या वैचारीक ठेवणीतील नव्हते. माझ्या स्वताःच्या, आणि वडीलोपार्जीत परंपरेनुसार नव्हते. ज्यांत निश्चीत असायचे प्रेम, व्यक्त व्हायचा आदर, वडीलधाऱ्याना भरपुर सन्मान देणारे. आणि ही नात, व्यक्त करीत होती तेच प्रेम भिन्न प्रकारे. तशीच आपुलकी जवळीक साधून. ती मनाच्या खोलीत शिरत होती. मात्र तेथे आदर, सन्मान ह्या श्रेष्ठत्वाच्या भावनीक दऱ्या नव्हत्या. ” जशी माझी आई, तसेच माझे आजोबा ” ह्या स्थरावर तीने उडी घेतल्याचे जाणवले.

माझे डोळे तीच्या व्यक्त प्रेमाणे पाणावले. मी तीला जवळ केले. पठीवरुन डोक्यावरुन हात फिरवला. ती जवळ समोरच्या स्टूलवर बसली. ” मी आता ५ वीत गेले. English medium आहे. मराठीपण शिकते.”

“छान. तुला एखादी कविता पाठ आहे कां? “मी” अं नाही, मी पहीली पर्यंत शिकताना Twinkle Twinkle little star, Ba Ba Black Sheep, Humpty Dumpty,पाठ केलेले होते. ते आजूनही पाठ आहे. ते म्हणू मी आजोबा” “नको, त्या कविता आता नको. सध्याच्या कोणत्या कविता पाठ केलेल्या आहेत कां ? “मी.” नाही एकही पाठ नाही. आमच्याकडून तसे पाठांतरही करुन घेत नाहीत. ” ती गप्प झाली. मला तीच्या ह्या वैच्यारीक ठेवणीची खंत वाटली.”अग पाठांतर तर हवेच ना. माझ्या शाळेच्या वेळी ज्या कविता आम्ही पाठ केल्या होत्या त्या आजही आठवतात.” मी लगेच कविश्रेष्ठ वामन पंडीताची शार्दुलविक्रीत चालीवरली कविता म्हणून दाखविली. कवितेतील शब्द, भाषा, उच्यार साधून, हातवारे करुन, ती खड्या आवाजात म्हणून दाखवली. नातीच्या चेहऱ्यावर आश्चर्य व कौतूक उमटल्याचे जाणवले. “You are a Great आजोबा.

मी हे कधीच ऐकले नव्हते. हे वामन पंडीत कोण होते, मला माहीत नाही. पण खुप आवघड आहे सारे. मला तर कांहीच कळले नाही, ते काय म्हणाले.” त्याच क्षणी मीपण मनातून चरकलो. कारण माझे पाठांतर, शब्द जंजाळ, जरी परीणामकारक व भारदस्त वाटले तरी त्याचे अर्थ, काव्यभाव मला केव्हांच कळलेला नव्हता. अनेक कविता, श्लोक, रामरक्षा, भगवतगीतेमधले कांही अध्याय आम्ही मुखोद्गत केले होते. धाड धाड ते उच्चारत आम्ही म्हणत असू. सांगणारांनी पण आमची क्षमता दुर्लक्षित करीत ते पाठांतर कसे होइल ह्याकडेच लक्ष केंद्रित केले. सध्या पाठांतर करा. अर्थ समजण्याच्या मागे लागू नका. पुढे मोठे झाल्यावर सर्व अर्थ कळतील. ही त्यांची वैचारीक शैली. पाठांतर होत गेले. अर्थबोधसाठी मात्र आज तागायत वंच्छीत राहीलो.

माझी वैचीरीक तंद्री नातीनेच मोडली. ” आजोबा तुम्हाला English कवी Wordsworth माहीत आहे कां ? ” हो ” मी म्हटले. ” आहो तो खरच काय Great Poet होता. त्याला निसर्ग कवी म्हणतात. त्याने एक Butterfly वर कविता लिहीली. टिचरनी आम्हाला सांगीतली. पण मला ती पाठ नाही. काय म्हणतो तो कवी. सांगू तुम्हाला. “- – – हे बघा किती सुंदर आहे हे फुलपाखरु. – – – कसे रंग बिरंगी त्याचे पंख आहेत. – – – त्यावर कसे टिपके टिपके काढलेले दिसतात. देवाची ही महान कला बघताना, किती आनंद होतो. आणि ते फुलपाखरु नाजुक नाजुक आहे. फुलांच्या नाजुक पाकळ्यावर किती अलगद बसते. फुलपाखरु स्वताःला जपते, तसेच त्या फुलाना देखील. कारण दोघेही नाजुक असतात म्हणून. – – – किती छान कल्पना आहे, त्या कविची आजोबा.” नात, तीने तीच्या टिचरकडून ऐकलेले सारे रसग्रहण, तन्मयतेने मला सांगतले. कांहीही न पाठ केलेले, परंतु संपूर्ण समजलेले. नव्हे तीने हे जाणलेले.

मी नातीकडे लक्ष केंद्रित करीत, सारे ऐकत होतो. कवितेप्रमाणेच तीलाही जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. मी कवितांच्या पाठांतरा भोवती घिरटिया घालीत होतो. ती मात्र तीचे मैदान कविता सार, त्यातील भाव, त्यातील तत्वज्ञान, ह्यावर रपेट मारीत होती. हे सर्वसामान्याना सोपे नव्हते. त्यांत मेहनत, एकाग्रता, आणि समज ह्याचे प्रचंड एकीकरण होते.

माझी धाव फक्त मनापर्यंत, जेथे विचारांची गर्दी असते. तर नात अप्रत्यक्ष आत्म्यापर्यंत झेप घेत असल्याचे जाणवले जेथे फक्त भावनीक साम्राज्य होते. बदलत्या पिढीला काय हवय असत ? “तुमच फक्त चांगल असण ” To set an example that you are a good great. कारण प्रत्येकजण चांगल आणि मोठ ( A good great ) होण्याचा प्रयत्न करीत असतो.

– – – मात्र तुमच चांगल बोलन, चांगला उपदेश, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मज्ञान, वागणूक, घराण्याच्या परंपरा इत्यादी , ह्या सर्व गोष्टी दुय्यम ठरतात.

जीवन चक्र सतत चालते. रोजचा दिवस नवा. रोजचा विचार नवा. कोणत्या विचाराला योग्य वा चांगले समजणार.? फक्त श्रेष्ठत्वाचा द्दष्टीकोण बाळगत असाल, तर प्रत्येकाला त्याचेच आचार विचार आग्रही वाटतील. मग जगाला थांबावे लागेल. निसर्गाला हे केंव्हाच मान्य नसते. कारण नाविन्य हेच जीवनाचे वैशिष्ट.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail- bknagapurkar@gmail.com

— डॉ. भगवान नागापूरकर

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..