मी
वाटेतले काटे खुडून चालतो मी
शब्द द्वेशाचे गाळून बोलतो मी.
आगीची काय दहशत दाखवीता
वीज ऊराशी घेऊन चालतो मी
पांडूरंग तिथे राहतो ऊभा
जिथे हात जोडून राहतो मी
फ़ुलांचे काय आमीश दाखवीता
माळ तार्यांची लेवून चालतो मी.
सिंहासनाचे नाही वेड मजला
सावळ्या मातीत धन्य पावतो मी.
बात कालची काय सांगता
स्वप्न उद्याचे चाळून पाहतो मी.
…………….कवीता – जयेश मेस्त्री….
९८३३९७८३८४
Email: smartboy.mestry5@gmail.com
— जयेश मेस्त्री
Leave a Reply