मुंज, उपनयन, व्रतबंध हा सोळा संस्कारांपैकी दहावा संस्कार आहे. या संस्कारानंतर मुलगा गुरुग्रही विद्यासंपादनासाठी पाठवण्यात येतो. या संस्कारात एक विधी महत्वाचा आहे तो म्हणजे मुंडण.
मुंडण का करायचे? याला शास्त्रीय आधार पुरातन ग्रंथात दिसत नाही, परंतु हि क्रिया उपनयन संस्कारमध्ये अनिवार्य आहे, त्याचा अर्थ जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे.
पुरातन काळी गुरुकुल मधील सर्व मुले दररोज नदीवर स्नानासाठी जात असत, नदीच्या गार पाण्यात पहाटे स्नान करावे लगे, त्यामुळे आजाराला आमंत्रण मिळत असे. लहान म्हणजे ८-९ वर्षाच्या मुलांना डोके स्वच्छ पुसणे जमत नाही, जर डोक्यावर केस असतील तर, केसातील पाणी पूर्ण निघून जाण्याची शक्यता कमीच, यामुळे सर्दी, खोकला आणि सोबत ताप येण्याचे प्रकार वारंवार होऊ शकतात.
शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी वारंवार आजारी होऊ शकतात ज्या मुळे मोठ्या प्रमाणात शिक्षणात व्यत्यय होऊ शकतो, त्याच बरोबर बरीच मूले गुरुकुल मध्ये रहात असल्यामुळे, उवा किव्वा तस्सम प्रकारचे कीटक डोक्यात राहण्याची शक्यता अधिक, ज्यामुळे डोके खाजवणे, डोक्यात फोड येणे, तसेच हे प्राणी चावल्यामुळे आजार होऊ नयेत म्हणून मुंडण करणे हाच उपाय दिसून आला.
त्या काळी आजच्या सारखे खूप कपडे तयार होत नसत, आजकालच्या टर्किश टॉवेल सारखी वस्त्रे ज्यात पाणी टिपले जाऊ शकते, त्या काळात नव्हती, बहुतेक लोक उपरण्यानेच अंग पुसत असत, जे तलम कापडाचे असे ज्यात डोक्यातील पाणी पूर्णपणे निघण्याची शक्यता कमीच होती. महिला श्रुंगाराचा भाग म्हणून केस वाढवतात, पूर्वी राजे लोक तसेच त्यांच्या पदरी असलेले उच्च पदस्त लोक केस वाढवत असत, ते त्यांना काही पैसे खर्च करून नीटनेटके ठेवावे लागत असे, विद्या शिकायला जाणाऱ्या मुलांना हि चैन नक्कीच परवडणारी नसतेच, त्यामुळे डोक्याचा गोटा केला कि सर्वच प्रश्न सुटत असत.
मुलांना स्वयंपाक सुद्धा करावे लगे, म्हणून केस अन्नात पडू नयेत हा सुद्धा विचार नक्किच केले गेला असणार. आजकाल हॉटेल मध्ये स्वयापाकी (कुक) नाही का डोक्याला टोपी घालून स्वयपाक करतात, त्याचे हेच कारण आहे.
बौद्ध भिक्कू, जैन मुनी सुद्धा डोक्याचे संपूर्ण केस काढून स्वतःचे शरीर स्वच्छ ठेवतात. केस वाढवणे, हे मुलांना मुळात आवडते, जर हे नाहीसे केले तर अहंकार तसेच न्यूनगंड संपतो, उच्च, नीच हा भेदभाव हि नष्ट होतो, यामुळे सर्व मुले समान पातळीवर उभीराहून विद्याविभूषित होण्यास पात्र ठरतात.
आजही सैन्य दलात बारीक केस ठेवणे हाच नियम आहे, कारण सीमेवर सैनिक आपल्यासारखे स्नानगृहात आंघोळ करत नाहीत, त्यानाही नदीचाच आधार घ्यावा लागतो. नदीतील घाण केसात अडकून केस राठ बनतात, त्यामुळे व्यक्ती विद्रूप दिसते, हे होऊ नये म्हणूनच शिक्षण काळात तसेच उर्वरित आयुष्यात सुद्धा लोक मुंडण करून स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करत होते, असे नाही का वाटत?
धन्यवाद
— विजय लिमये
9326040204
Leave a Reply