मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो…
बसमध्ये सीटवर बसलेला बस आपल्या बापाची समजतो …
सारखेच पैसे देऊनही एक आरामात आणि
दुसरा धक्के बुक्के किव्हा प्रसंगी शिव्याही खात असतो …
कंडक्टर सारखा आगे बढो म्हणत असतो
शेवटी उतरणाराही दरवाज्यात पोहचत असतो…
मुंबईतील बसचा प्रवासी बऱ्याचदा चुकून
झालेल्या चुकीचाच दंड भरत असतो…
त्या चुका करण्यालाही कधी – कधी
त्याचा नाइलाज कारणीभूत असतो…
बस मध्ये पुरुषाला स्त्रीचा धक्का
लागला तर तो माफ असतो…
पण पुरुषाचा चुकूनही स्त्रीला लागला
तरी तो नालायक ठरतो…
बसमध्ये राखीव जागा मिळविण्यासाठी
जो तो धडपडत असतो …
त्या धडपडीचा त्रासही विनाकारण निमूट उभ्याने
प्रवास करणाऱ्यांनाच सहन करावा लागतो…
म्हणूनच म्हणतो मुंबईतील बसचा प्रवास अगदी नकोस होतो …
याच बसमध्ये कित्येकदा नवीन भांडणाचा ,
भानगडीचा आणि प्रसंगी प्रेमप्रकरणाचा जन्म होतो …
माझ्या सारखा चुकून एकादा लेखकही या बस मुळेच घडतो …
जो या बसमध्येच कित्येक कावितांसह
कथाही जन्माला घालतो …
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply