माझा चेहरा पाहून मला
जाणून घेण केवळ अशक्य…
त्याला कारण माझ्या चेहर्यावरील
बदलत गेलेले मुखवटे
वयाच्या प्रत्येक टप्प्यात…
आता तर माझा खरा चेहरा
त्या मुखवट्याखाली वर्षानुवर्षे
झाकलेला मीच आठवतोय…
असेल माझ्या चेहर्यावर
ज्या दिवशी जो मुखवटा
माझा स्वभाव असतो तसाच…
म्ह्णूनच होतो मी
कधी क्रोधाने ज्वालामुखी
तर कधी असतो प्रेमाचा महासागर…
पडतो कित्येकांच्या प्रेमात
मी क्षणात वेड्यासारखा
पण ते वेड उतरायला लागतो
मला फक्त एक मुखवटा
उतरवायचा अवकाश…
माझे मन कधीच स्थिर नसते
बदललेल्या मुखवट्या प्रमाणे
ते कधी जमिनीवर
तर कधी असते अवकाशात…
माझ्या चेह्र्यावरील बदललेल्या
मुखवट्या प्रमाणे माझा मोह ही बदलतो
कधी हवी असते मला असिम शांतता
तर कधी धन – दौलत…
माझ्या चेहर्यावर चढ्लेल्या
मुखवट्यामुळे मी कधी असतो साधू
तर कधी होतो भोगी माणूस…
पाहतो जो माझा खरा चेहरा
मुखवट्या खाली दडलेला
तो होतो माझा भक्त…
माणूस म्ह्णून जन्माला आलो
तर माणूस म्ह्णूनच मरणार
त्यासाठी विनाकारण देवत्व
मी नाही स्विकारणार…
मुखवट्या खाली लपलेला
माझा खरा चेहरा
पाहण्याचा प्रयत्न आता
मी ही नाही करणार …
— कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
Leave a Reply