राधा ही बावरी फेम सौरभ गोखलेची मुलाखत माझी पत्नी सौ. रेशमा जयेश मेस्त्री यांनी “महाराष्ट्र २४ तास”साठी घेतली. त्याची एक झलक इथे देत आहे. संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी आपल्या ऍंड्रॉईड मोबाईलवर “महाराष्ट्र २४ तास” टाईप करा किंवा खालील लिंकवर क्लिक करा.. https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.bnm
नमस्कार मी रेशमा मेस्त्री गप्पा टप्पा या कार्यक्रमात आपले स्वागत करते. सध्या झी.टी.व्ही वर सुरु असलेली मालिका राधा ही बावरीमधील चॉकलेट बॉय म्हणजेच सौरभ गोखले आज आपल्या सोबत आहे. हाय सय्रभ महाराष्ट्र २४ तास या कार्यक्रमात तुझं स्वागत आहे.
प्रश्न : तु पिंपरीतील डॉक्टर कुटूंबातील मुलगा. एमबीए करुन मग जॉब केलास. आता पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात आहेस. तुझ्या या प्रवासाबद्दल आम्हाला सांग. अभिनयाची सुरुवात कशी झाली?
सौरभ : तसं पाहायला गेलं तर मी लहानपणासून शाळेत कॉलेजमध्ये अभिनय करायचो. पण शिक्षणाच्या बाबतीत मी तितकाच सिरीयस होतो. मी बीकॉम केलं, मासकॉम, कंपनीमध्ये कामाचा अनुभव घेतला. एमबीए केलं आणि मग ठरवलं की आता पूर्णवेळ या क्षेत्रात यायला हरकत नाही… आणि पूर्णवेळ या क्षेत्रात आलो.
प्रश्न : राधा ही बावरीतला सौरभ आणि खर्या आयुष्यातील सौरभ हे दोन्ही सारखेच आहेत की वेगवेगळे?
सौरभ : हा..हा.. राधा ही बावरीतला सौरभ आपल्या करीयरच्या बाबतीत सिरीयस नाही. माझं त्याउलट आहे, मी आपल्या करीयरच्या बाबतीत खुप सिरीयस आहे. इतर गोष्टी म्हणार तर मस्ती स्वभाव वगैरे सगळं सारखच आहे. पण ह्या एका गोष्टी बाबतीत पुष्कळ फरक आहे.
प्रश्न : तु योद्धा या चित्रपटात पोलिस अधिकार्याची भुमिका केली आहेस. ही भुमिका तुझ्या चॉकलेट बॉयच्या इमेजला छेदणारी आहे का?
सौरभ : छेदणारी वगैरे नाही… मुळात मला एका इमेजमध्ये अडकून राहायला आवडत नाही. मला वेगवेगळ्या प्रकारच्या भुमिका करायच्या आहेत.
प्रश्न : तुझ्या शाळेतील एखादी आठवण सांग.
सौरभ : शाळेतील आठवणी तर खुप आहेत. त्यापैकी एक सांगतो… आमच्या शाळेतही नाटकं बसवायचो तेव्हा मी छोटा शिवाजी करत होतो आणि तो सीन सुरु होता.. दादाजी कोंडदेव शिवाजीला हत्यारे चालवायला शिकवत होते. तेव्हा आम्ही स्टेजवर तोफ सुद्धा लावायचो आणि एकदा असं झालं की मी तोफ लावल्यावर त्याची ठिणगी दादाजी कोंडदेव बनलेल्या मुलाच्या धोतरावर उडाली आणि त्याचं धोतर जळालं. तेव्हा मी लगेच त्याला वींगेत ढकलले. आणि बिच्चारा सावरासावर करुन परत आला.. हा एक गमतीदार प्रसंग आठवतो.
प्रश्न : अनुजाशी तुझी ओळख कशी झाली?
सौरभ : तसं बघायला गेलं तर “मांडला दोन घडीचा डाव” या मालिकेमध्ये आम्ही एकमेकांना भेटलो आणि प्रेमात पडलो. पण नंतर कळलं की माझ्या सख्या मावस भावाची ती मैत्रीण होती आणि तिचा सख्खा मोठा भाऊ व मी शाळेत वर्गमित्र होतो. तरी तेव्हा आमची पूण्यात असूनही कधीच अशी भेट झाली नाही. कदाचित आम्हाला मुंबईला आल्यानंतर भेटायचं होतं.
प्रश्न : कुठलं शहर जास्त आवडतं, मुंबई की पुणे?
सौरभ : दोन्हीही, कारण जर का करीयरच्या दष्टीकोनातून विचार केला तर मुंबईत खुप स्कोप आहे. जागा लहान व लोकसंख्या जास्त असल्यामुळे थोडा त्रास होतो. पण करीयर आहे ते मुंबईत. म्हणून तर लोक लांबून य्रेथे येतात आणि पुण्याचं म्हणाल तर राहण्यासाठी पुण्यासारखी जागा नाही. लोक राहण्यासाठी पुण्यात येतात. पुण्यात माझं घर असल्यामुळे पुणे आणि मुंबई ही दोन्ही शहरं मला सारखीच वाटतात.
प्रश्न : कोणत्या प्रकारची भुमिका करायला तुला आवडेल?
सौरभ : असं काही ठरलं नाही. पण एका इमेजमध्ये अडकून न राहता वेगवेगळ्या भुमिका करायला आवडेल.
प्रश्न : महाराष्ट्र २४ तासच्या वांचकांसाठी दोन शब्द सांग
सौरभ : तुमच्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो. यापुढेही तुमचे प्रेम आणि आशिर्वाद असेच लाभू द्या.
धन्यवाद सौरभ.. महाराष्ट्र २४ ताससोबत मनसोक्त गप्पा मारल्याबद्दल… तुझ्या पुढच्या करीयरसाठी मनसोक्त शुभेच्छा..
वाचकहो.. आज आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटू अशाच एका लोकप्रिय कलाकारासोबत, तोपर्यंत वाचत रहा.. महाराष्ट्र २४ तास…
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply