गुदद्वाराच्या आतील भागास असलेल्या अशुद्ध रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे तेथील आंतरवर्णासह सैल सुटते त्या वेळी हाताला कसला तरी कोंब किंवा मोड लागतो. ब-याचदा यामध्ये वेदना व रक्तस्राव प्रकट होतो. या स्थितीलाच मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याधीचे दोन प्रकार करण्यात आलेले आहेत. 1. आंतर मूळव्याध व 2. बाह्य मूळव्याध. मोड किंवा अंकु र किंवा व्रण गुदद्वाराच्या आतील भागात निर्माण झाले असतील तर त्याला आंतर मूळव्याध असे म्हणतात. हेच अंकुर जेव्हा आणखी खाली सरकून गुदद्वाराच्या बाहेर येतात तेव्हा त्याला बाह्य मूळव्याध, असे म्हणतात. एकाच व्यक्तीला वरील दोन्ही प्रकारचा त्रास असू शकतो.
मूळव्याधीची लक्षणे : मलत्यागाच्या वेळी जळजळणे, वेदना होणे आणि रक्तस्राव होणे हे या आजाराचे प्रारंभिक लक्षण होय. याशिवाय मलाच्या वरील भागावर लालसर रेषा प्रकट होणे, थेंब थेंब रक्त पडणे, मलाशयातून रक्तस्राव होऊन अॅ निमिया निर्माण होणे इत्यादी लक्षणे प्रकट होतात.
योगासने व व्यायाम : योगासने ही मूळव्याधीवर अतिशय उपायकारी व्यायाम पद्धती आहे.
रोज सकाळी २-३ किलोमीटर चालणे. सकाळ-संध्याकाळ सर्वांगासनाच्या स्थितीमध्ये राहून सायकल चालवण्यासारखा व्यायाम करावा. या उपचाराने पूर्णपणे मूळव्याधी बरी झाली असता नैसर्गिक जीवन पद्धतीची कास सोडू नये.
ऑपरेशनच्या नावाखाली मूळव्याधीला जाळण्याचे व कापण्याचे प्रयोग चालतात. यामुळे वरवर फायदा निश्चितच दिसून येतो, परंतु चुकीच्या आहाराविहारात सुधारणा न केल्याने मोठ्या आतड्याचे इतर विकार उद्भवतात. दुसरे विकार होऊ नयेत म्हणून ऑपरेशननंतरही नैसर्गिक उपचार पद्धती अमलात आणली पाहिजे.
आहार चिकित्सा व उपचार रोज १०-१२ ग्लास पाणी प्यावे. हिरव्या पालेभाज्या जास्त आहारात असाव्यात. चिकन, मटन, मसाल्याचे पदार्थ, तेलकट, बाजरीची भाकर, जास्त गरम पदार्थ टाळावेत. ओवा, जंगली ओवा, खुरासणी ओवा यांचे बारीक चूर्ण करून थोड्याशा लोण्यात कालवून सकाळ-संध्याकाळ मूळव्याधीच्या फोडांवर लावावे. वरील उपायांनी आराम पडत नसेल तर चिकित्सकांकडून इलाज करणे आवश्यक ठरेल.
होमिओपॅथिक उपचार होमिओपॅथिक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. यापासून कोणतेही दूष्परिणाम होत नाही. रुग्णाचा सर्वांगीण अर्थात शारीरिक आजाराचा व मानसिकतेचा अभ्यास करून रुग्णाला औषध दिले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply