वर्क फ्रॉम होम – घरबसल्या काम करायची एक नवी संस्कृती
कॉर्पोरेट्स मध्ये नव्यानेच येऊ लागलेल्या या वर्क फ्रॉम होम संस्कृतीचे फायदे खालीलप्रमाणे:
१. घरातील माणसांना आपण पुरेसा वेळ देऊ शकतो.
२. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो.
३. ऑफिस पॉलिटिक्स् मधून सुटका होते.
४. शांतपणे आपलं काम आपल्या पद्धतीने करता येतं. तसं म्हटलं तर या संस्कृतीत माणसं चोवीस तास कामावरच असतात. पण तरीही आपल्या मनाचे राजे असतात.
५. नोकरीवर ठेवण्यार्यांचा खर्च वाचतो. लाइट बिल, जागेचं भाडं सगळंच कमी होतं.
६. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी काम करता येतं. रात्री मी काम करणार नाही, फोन उचलू शकत नाही, अशी कोणतीही कारणं शोधत बसावी लागत नाही.
पण ही कार्यसंस्कृती यशस्वी होण्यासाठी आणि तिचा आवश्यक व प्रामाणिक फायदा करुन घेण्यासाठी तसाच प्रामाणिक आणि वक्तशीरपणा असलेला चाकरदार वर्ग लागेल हे मात्र खरं. चोवीस तास काम आणि तरीही फ्री-बर्ड अशी ही कार्यपद्धती परदेशात नेहमीचीच झाली असली तरी आपल्याकडे हिला रुळायला थोडा वेळ लागेल हे निश्चित.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply