स्मृती इराणी याचे माहेरचे नाव स्मृती मल्होत्रा. स्मृती या तीन बहिणींपैकी सर्वात मोठ्या आहेत. दहावीच्या वर्गात असल्यापासूनच त्यांनी काम करायला सुरवात केली. एक ब्यूटी प्रॉडक्टच्या प्रचारासाठी त्यांना दिवसाला २०० रूपये मिळत असत. माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली होती. अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी मा.स्मृती इराणी दिल्लीतून मायानगरी मुंबईत आल्या. त्यांचे पूर्ण बालपण दिल्लीतच गेले. मा.स्मृती इराणी यांनी छोट्या पडद्यावरची अभिनेत्री म्हणून आपल्या कामाला सुरवात केली. त्यानंतर संपूर्ण देशात त्या तुलसी विरानी या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. छोड्या पडद्यावर स्वताची वेगळी छाप पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये त्या आघाडीवर होत्या. १९९८ मध्ये मिस इंडियाचा मुकुट मिळवण्यासाठी मा.स्मृती इराणी यांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांना तो मिळाला नाही. पहिल्या पाचमध्येच त्यांना समाधान मानावं लागलं. मा.स्मृती इराणी यांनी या मिस इंडियाच्या स्पर्धेसाठी आपल्या आईकडून काही रक्कम घेतली होती. ती रक्कम परत करण्यासाठी इराणी यांनी नोकरीसाठी शोधा-शोध सुरू केली. जेट एअरवेज मध्ये त्यांनी फ्लाईट अटेडेंट पदासाठी अर्जही दाखल केला होता. मात्र त्यात त्यांना अपयश आले. अनेक ऑडीशनसाठी मध्येही त्यांना रिजेक्ट करण्यात आले. सुरवातीला मॅकडोनाल्ड मध्ये काम करणाऱ्या मा.स्मृती इराणी यांनी प्रसिध्दीचा दरवाजा खटखटवला जरूर, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मल्टीनॅशनल कंपनीच्या नियमानुसार मॅकडोनाल्ड सारख्या कंपनीतील कामगारांना हॉटेलचे अकाऊंट सांभाळण्यापासून ते टेबल किंवा फरशी पुसण्यापर्यंत सर्व कामं करावी लागतात. ही सर्व कामं त्यांनी केली. एकता कपूरच्य़ा ओह ला ला ला शोमधील एका भागात निलम कोठारीच्या ऎवजी त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
क्योंकी सास भी कभी बहू थी या सिरीयलमध्ये काम करण्यापूर्वी स्मृती इराणी यांनी आतिश आणि हम है कल आज और कल या सिरीयलमध्ये काम केले होते. मात्र त्यांची खरी ओळख झाली ती तुलसी विरानी या भूमेकेतून. बघता बघता सिरीयलच्या माध्यमातून ती छोट्या पडद्यावरची सर्वात लाडकी बहू बनली. छोट्या पडद्यावरील सर्वात शांत सून म्हणून ओळखली जाणारी तुलसी प्रत्य़क्ष आयुष्यात मात्र वेगळ्या आहेत. आपल्या विरोधकांवर तिखट टीका करताना स्मृती इराणी यांना अनेकांनी पाहिलं आहे. त्यांनी २००३ साली राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या भाजपच्या स्टार प्रचारक बनल्या. २००४ साली काँग्रेसचे नेते मा.कपील सिब्बल यांच्या विरोधात स्मृती यांनी निवडणूक लढवली होती. मा.स्मृती इराणी यांना त्यात अपयश आले होते. २०१० मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, ऑल इंडिया भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली. २०११ मध्ये गुजरातमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. त्यांच्य़ा याच स्वभावामुळे लोकसभा निवडणूकीत भाजपने त्यांना राहूल गांधींच्या विरोधात अमेठीतून उभे केले. त्यात स्मृती इराणी यांना अपयश आले मात्र राहूल गांधींना त्यांनी कडवी टक्कर दिली.मा. मोदी सरकार मध्ये स्मृती इराणी या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होत्या. सध्या स्मृती इराणी या सध्या केंद्रीय टेक्सटाईल मंत्री आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
स्मृती इराणी यांच्या भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका
आतिश, क्यूँ की सास भी कभी बहू थी, थोड़ी सी ज़मीन थोड़ा सा आसमाँ, रामायण, विरुद्ध, हम हैं कल, आजकल और कल
Leave a Reply