भगवान युद्ध सत्य, अहिंसा आणि मोक्षमुक्तीचा मार्ग कसा मिळवायचा याची लोकांना शिकवण देत देत एका गावात आले. त्यांना भेटण्यासाठी एक माणूस आला. बुद्धांना म्हणाला की, तुम्ही तुमच्या धर्माद्वारे सत्य, अहिंसा आणि मोक्षप्राप्तीचामार्ग सांगत आहात. परंतु मला सांगा, तुमची शिकवण ऐकून किती लोकांना मोक्षप्राप्ती झाली किंवा मुक्ती मिळाली. गौतम बुद्धांनी त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व ते स्मितहास्य करून त्याला म्हणाले की, तुझा प्रश्र अगदी योग्य आहे. मात्र त्या प्रश्र्नाचे उत्तर मिळण्यासाठी तूच एक काम कर. या गावातील अनेक लोकांना तू भेट व त्यापैकी किती लोकांना शांती हवी अहे, किती लोकांना सत्याचा मार्ग हवा आहे व किती लोकांना मोक्ष हवा आहे याची तू यादी तयार कर वती घेऊन माझ्याकडे ये म्हणजे मग मी तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर देईन.गौतम बुद्धानी सांगितल्याप्रमाणे तो माणूस त्या गावातील लोकांना भेटला च त्याने अनेकांना याबाबत तुम्हाला नेमके काय हवे आहे, असा प्रश्र विचारला. कोणी म्हणाले, आम्हाला भरपूर पैसा हवा आहे. त्याच्यामुळेच सुख-शांती मिळू शकेल. कोणी म्हणाले, आम्हाला सुपीक जमीन हवी आहे, तरक्केणी म्हणाले, आम्हाला सत्ता हवी आहे, – कोणाला राजवाडा हवा होता, तर कोणाला चांगली नोकरी हवी होती. एकानेही मला मोक्ष हवा आहे, असे पटकन संगितले नव्हते. काही दिवसांनी तो माणूस गौतम बुद्धांना भेटला व त्याने तयार केलेली यादी बुद्धांना सादर केली व बुद्धांना तो म्हणाला, लोकांना सत्य, शांती आणि मोक्ष सोडून बाकीचे सर्व काही हवे आहे. त्यावर बुद्ध त्याला म्हणाले, तुझ्या प्रश्राचे उत्तर तुला आता मिळालेच आहे. लोकांना जे काही हवे आहे त्यामुळे त्यांना सुख-शांती किंवा मोक्ष मिळणार नाही.उलट सुखाच्या प्राप्तीसाठी ते दुःखाच्या मार्गाने चालले आहेत. गौतम बुद्धांच्या या उत्तराने स्वा माणसाचे समाधान झाले व तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून निघून गेला.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply