रस्त्याच्या काठावर एका झाडाखाली बेंच वर बसलो होतो. येणारी-जाणारी *हरियाली निहारीत डोळ्यांना तृप्त करत होतो. तेवढ्यात तिच्याकडे लक्ष गेलं. कानात हेडफोन, हातवारे करीत कुणाशी गुलगुल बोलत होती. निरखून बघितले ती गुलाबाच्या कळी सारखी सुंदर दिसत होती. बोलताना सारखी हसत आणि खिदळत होती. प्रेमाचा रंग तिच्या गालावर खुलून दिसत होता. रस्त्याच्या
पलीकडे तिचा प्रियकर असावा. कदाचित त्याचाच स्वप्नात दंग, ट्रफिकची चिंता न बाळगत बेपर्वा ती तिच्याच धुंदीत रस्ता पार करू लागली.
अरररे… अचानक मी किंचाळलों. डोळे बंद केले. क्षणभर शांतता, मगच एकच गदारोळ. एक गुलाबाची कळी पायाखाली चुरगळली होती.
हरियाली निहारना : एका जागेवर बसून एका तरुण मुलीना बघण्याचा छंद (टिपिकल दिल्लीची भाषा) किंबहुना इंडिया गेट वर हिवाळ्याच्या दिवसांत लंच मधला बाबूंचा टाईम पास
(दिल्लीच्या एक मेट्रो स्टेशन वर मोबईल वर बोलता-बोलता एक मुलगी अशीच ट्रेन खाली आली होती)
— विवेक पटाईत
Leave a Reply