नवीन लेखन...

मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री मधुबाला

मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला.अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या मधुबाला यांची कारकीर्द मात्र शापित ठरली. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मा.मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. लहानपणी बेबी मुमताज म्हणूनही त्या ओळखली जायच्या. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे ‘मधुबाला’ असे नामकरण केले होते. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता. मधुबालावर तिच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीही पार्टी, प्रीमिअरमध्ये दिसली नाही. १९४२ साली आलेल्या ‘बसंत’ या सिनेमाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून १९४७ मध्ये ‘नीलकमल’ या सिनेमात त्या पहिल्यांदा झळकली होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता. ‘दिल की रानी’ हे दुस-या सिनेमाचे नाव. १९४८ मध्ये मा. मधुबाला यांचा ‘अमर प्रेम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सर्व सिनेमात मा.मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकली होती. या सिनेमानंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकीजच्या ‘महल’ सिनेमात काम केले होते. ‘महल’ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याकाळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने काम केले होते. अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद या आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने स्क्रिन स्पेस शेअर केली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकुण ६६ सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले.हॉलिवुडमध्ये जसा मर्लीन मन्रोने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने तिचा काळ गाजवला, तसाच बॉलिवुडमध्ये लावण्यवती मा.मधुबाला यांनी बॉलीवूड मध्ये गाजवला. भारतातच नव्हे पण हॉलीवुडपर्यंत मा.मधुबाला यांच्या सौंदर्याची कीर्ती गेली होती. जगप्रसिद्ध दिग्दर्शक मा.फ्रँक काप्रा यांनी भारतात येऊन मा.मधुबाला यांना हॉलीवुडमधील चित्रपटात चमकविण्याचे प्रयत्न केले होते.. पण त्यांच्या वडिलाच्या मुळे ते शक्य झाले नाही. काप्रामुळे तिच्याबद्दल तेथील माध्यमांनी यामुळे खूप लिखाण केले. १९५२ च्या तेथील एका नियतकालिकात असे म्हटले गेले की, “Madhubala ~~ The biggest star in the world and she is not in Beverlie Hills.” मा.नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने १८ मार्च २००८ ला मा.मधुबाला यांचे तिकीटा काढून मान दिला होता. मधुबाला यांचे निधन २३ फेब्रुवारी १९६९ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..