तुझ्या मौनाने सारं काही सुरळीत होणार असेल तुलाही बरं वाटणार असेल, तर………………. माझा विचार न करता, तू मौनच बाळग मी सुद्धा कधीच विचारणार नाही मला सवय आहे केवळ मन मारुन जगण्याची आपल्या भावना कोंडून ठेवण्याची संसाराच्या ओझ्याखाली दबून जायची अगदीच जमलं नाही तर ………….तरतुझ्या आठवणींमध्ये गढून जायची, तुझ्या प्रितीचा शिडकावा, तुझ्या मैत्रीचा शिडकावा जिथे जिथे बरसे, तिथे तिथे नंदनवन फुलेल पण ………..प्रीतीच्या भरारीसाठी, भावनांचा ओलावा, मनाचा हळवेपणा नसेल तर…………………दगडांवरती पेरलेले ते प्रीतीचं बीज करपून जाईल. आणि मग चैतन्यहीन साम्राज्यात, मला जगता येणार नाही आणि म्हणूनच सांगते……………….तुझ्या मौनाने, तुला खरोखरच बरं वाटणार असेल तर माझा विचार न करता, तू मौनच बाळग.
— सुषमा एडवण्णावर
Leave a Reply