नवीन लेखन...

यमदूती सुनामी

सार्‍या जगाला भयचकित करणारे सुनामी हा काय प्रकार आहे ? याची साद्यंत, सचित्र व शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत देणारे मराठीतील एकमेव पुस्तक. ले. गो. बा. सरदेसाई यांनी. पृ. 64 किं. 65 रू. ISBN: 978-93-80232-42-3नाशाला कारणीभूत असणार्‍या जगन्मान्य सुनामी लाटा या फार पूर्वीपासून उत्पन्न होत आल्या आहेत. फक्त त्यांचे नाव आपल्याला आत्ता माहीत झाले, परंतु नासधूस मात्र पूर्वीपासूनच सुरू आहे. त्या काळातील अनुभवी नाविकांना मात्र लक्षणांवरून संकटांची कल्पना येत असे. नुकसान, जिवीत हानी, आतासारखीच होत असे पण कारण कळत नसे. या सुनामी विषयी सर्वंकष माहिती देणारे, उत्तम पुस्तक श्री. गो. बा. सरदेसाई यांनी लिहिले असून नागपूरच्या नचिकेत प्रकाशनाने ते दर्जेदार रीत्या प्रकाशित केले आहे.

सर्व सामान्य लाटा किनार्‍याकडे येतांना त्यांचा वेग कमी होतो. पण सुनामी लाट उत्पन्न झाल्यावर तिची जी उंची असते, जणू एखादी भिंतच धावत येत आहे अशी असते, ती किनार्‍याला आली तरी कमी होत नाही आणि म्हणूनच ती परत जातांना, मोठी घरे, माणसे, गाड्या वगैरे सर्व आपल्याबरोबर समुद्रात नेते. शिवाय येताना जमिनीचा फार मोठा भाग व्यापून टाकते आणि मग अतिशय नुकसान होते आणि महासागरात मध्यभागी समुद्र खूप खोल असतो, अशा भागात लाटांची उंची खूप कमी असते. त्यामुळे प्रवाशांना कल्पना येत नाही. पण उथळ किनारा येईपर्यंत लाटांची उंची वाढत जाऊन 30 मी. उंचीपर्यंत लाट जाऊ शकते आणि मग ती किनारपट्टीला विध्वसंक ठरू शकते.

सुनामींची उत्पत्ती ही भूकंपामुळे होते. सागराच्या तळाशी झालेल्या भूकंपामुळे होत असते. सागरात असताना त्या सौम्य दिसल्या तरी किनारपट्टीवर त्या रौद्ररूप धारण करतात. (इतर सामान्य लाटांच्या अगदी विरूद्ध क्रिया) अशा लाटा म्हणजे महासागरात उत्पन्न होणारे जलतरंग आणि असे तरंग हे सागरातील भूकंपानंतर उत्पन्न होतात. तरंग आणि भूकंप याविषयी माहिती करून घेतल्या नंतरच सुनामी प्रकार नीट कळू शकतो आणि हेच सर्व आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. या तरंगांचे प्रकार उदा. प्राथमिक तरंग, कर्तर तरंग, दीर्घ तरंग, रॅले, प्रीत वगैरे. त्यांचा वेग (प्रत्येकाचा वेगळा) कळतो. शिवाय तरंगांची दोलने, तरंगांची गती ही अंतराप्रमाणे वेगळी असते, ती कशी? हेही कळते.

हिमनगाप्रमाणे सुनामी लाटांचा मोठा भाग महासागरांच्या तळाशी दडला असतो. किनार्‍याकडे येताना लांबी कमी होत उंची वाढत जाते. आणि त्यावर विध्वंस अवलंबून असतो. गंमत म्हणजे सुनामी हा शब्द जपानी आहे. जपानी भाषेत सु म्हणजे बंदर आणि नामी म्हणजे लाट, म्हणजेच बंदराजवळ आलेली लाट! या लाटांची निर्मिती ही शक्तिशाली भूकंप, उद्रेक, त्यांचा काळ, वेग, वेगाप्रमाणे उंची किती असते? वगैरे सुनामी लाटांची वैशिष्ट्ये, भूकंपाचे कारण, वगैरे बरीच सखोल माहिती मिळते. भूकंप निर्मित सुनामी लाटा कशा? त्या भूकंपाचे कारण वगैरे गोष्टी ह्यात सविस्तर दिल्या आहेत. शिवाय अशा कोणत्या घटना असू शकतात कि ज्यामुळे (आधी समजल्या तर) नुकसान कमी होईल व प्राणहानी तरी वाचू शकते ते इथे फार चांगल्या प्रकारे व सविस्तर सांगितले आहे.

उदा. आकाशातील उपग्रहांची मदत, पक्षांच्या हालचाली, वेगवेगळ्या देशातील उपग्रहे यांच्या माध्यमातून 4-6 तास आधी कशी मिळू शकते? ह्या लाटांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा कसे कार्य करते आणि ते कार्य किती आवश्यक आहे ही बाब सूचित केली आहे. ही माहिती वाचून वेळ आल्यास जीव कसा वाचवता येईल इतरांनीही ही माहिती देता येईल. एकूण हे पुस्तक वाचून सुनामी लाटा ह्या यमदूती कशा आहेत हे कळून आपल्या ज्ञानात भर पडते.

वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुस्तकातील चित्रांमुळे खूप चांगल्या प्रकारे सर्व समजून येते. उदा. आवाज न करता पर्वतासारखी येणारी लाट. उथळ व खोल सागरात पाण्यातील तरंगामधले जल कणांचे मार्ग, तरंगांचे प्रकार, त्यांची पातळी, दिशा, लांबी, उंची, समुद्र किनार्‍यावर फुटणारी लाट, विशेष म्हणजे भूकंप कसा घडतो? भूकंपातील हालचाली, सूनामी लाटांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा वगैरे 10, 11 चित्रे आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यार्थी वर्गासाठी तर उत्तमच पण इतर उत्सुक वाचकांसाठीही उत्तम आहे.

यमदूती सुनामी विभावरी शेंबेकर लेखक : श्री. गो.बा. सरदेसाई पाने : ६४ किंमत : ६५ रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 / 9405142209

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..