येणार नवीन वर्ष, एक नवीन संकल्प घेऊन येत
स्वप्न ते देऊन जात, आठवणी घेऊन जात
येणार नवीन वर्ष, एक वर्ष सरल्याची जाणीव देत
पुढची वर्षे जगण्याच, जीवनातील ते बळ देत
येणार नवीन वर्ष, काही गोष्टी विसरायला सांगत
काही नवीन गोष्टी ,जवळ करण्यास भाग पाडत
येणार नवीन वर्ष, आपल्यासह भविष्य घेऊन येत
भूतकाळास ते कटू, हसत राम राम करत असत
येणार नवीन वर्ष, सर्वांनाच हव हवस वाटत असत
कारण जग उगवत्याच, सूर्यासमोर नेहमी झुकत
येणार नवीन वर्ष, सर्वांसाठी छान एक उत्सव ठरत
वर्षाव शुभेच्छांचा, जणू साऱ्या जगावर करत
— निलेश बामणे
Leave a Reply