मानवी शरीरात 50 हजार अब्ज पेशी असतात. प्रत्येक पेशीला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी ऊर्जा लागते. ही ऊर्जा पेशीतच तयार होते. ही उत्पन्न करण्याकरता प्राणवायू आणि अन्नघटक लागतात. हे संपूर्ण शरीरभर पुरवण्याचे कार्य हृदय आणि रुधिराभिसरण संस्था करीत असतात. या संस्थांमधून रक्ताचा प्रवाह सतत चालू असतो. असा प्रवास टिकण्याकरता या संस्थेत जागोजागी कमी-जास्त दाब निर्माण केला जातो. या दाबाला रक्तदाब म्हणतात. या रक्तदाबाचा एक परिणाम म्हणजे रक्ता पुढे-पुढे ढकलले जाते. दुसरा म्हणजे, या दाबाचा परिणाम रक्त्वाहिन्यांच्या आतल्या अस्तरांवर होतो. या अस्तरावरील दाबामुळे रक्ताातील कोलेस्टेरॉल या मेणासारख्या मेद घटकाचे रेणू रक्तवाहिन्यांच्या अस्तरात जातात. तेथे कोलेस्टेरॉलच्या रेणूची ढेकळे बनतात. या ढेकळांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. अरुंद आलेल्या रक्तवाहीन्यांतून रक्त जोरात वाहू लागले की अस्तराला चिरा पडतात. जेथे चीर पडते तेथे रक्त गोठते. गोठलेल्या रक्त वाहिन्यांतून रक्त अवयवाकडे जाऊ शकत नाही. हृदय, मेंदू, मूत्रपिंड, नेत्रपटल इत्यादी ठिकाणी रक्त न पोचल्यामुळे ते ते अवयव अकार्यक्षम होतात. यामुळे प्रकृती ढासळते व धोका निर्माण होतो. रक्तदाब वाढण्याचे एक कारण आपल्या आहारातील मीठ हे होय. आपल्या गरजेच्या मानाने मानव प्राणी खूप जास्त मीठ खातो. परिणामी रक्तीदाब वाढत जातो. रक्तदाब आटोक्यात राहावा यासाठी मिठाचे सेवन जितके कमी करता येईल तेवढे चांगले.
संथ गतीने दीर्घ काळ चालणे किंवा संथ गतीने दीर्घ काळ सायकल चालविणे अथवा पोहणे या व्यायामप्रकारांचा रुधिराभिसरण संस्थेला खूप फायदा होतो. 40 मिनिटे दिवसातून 2 वेळा चालत राहण्याने 1 आठवड्यात 2 हजार उष्मांक वापरले जातात. 3 हजार पाचशे उष्मांक वापरले गेले की 1 पौंड मेद घटतो. हृदयाला प्रत्येक स्पंदनाबरोबर तेवढे रक्ता पुढे ढकलावे लागते. नियमाने पायी चालण्याने हळूहळू वजन कमी होईल व रक्ताभिसरणावरचा ताणही कमी होऊ लागेल. रक्तदाब वाढण्याची इतर कारणे असू शकतात. त्यात मूत्रपिंडाचे दोष महत्त्वाचे असतात. त्या दृष्टीने तपासण्या करून दोष सापडल्यास ते दुरुस्त करणे हिताचे असते. काही औषधांनीदेखील रक्तदाब वाढतो. ज्यांच्या घराण्यात रक्तदाब वाढण्याची प्रवृत्ती आहे, अशा व्यक्तीं नी कोणतेही औषध घेण्यापूर्वी त्या औषधाचा रक्तदाबावरचा संभाव्य परिणाम जाणून घेणे आवश्यक आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई
Leave a Reply