![Rajnikant](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2017/01/Rajnikant.jpeg)
रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी झाला. शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत यांचे चाहते केवळ देशातच नाही तर जगभरात आहेत. रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. टॉलीवुडचे सुपरस्टार रजनीकांत यांचे मुळ गाव पुरंदर तालुक्यातील मावडी-कडेपठार हे आहे. सधारण ८०-९० वर्षांपुर्वी गायकवाड परिवार रोजगाराच्या शोधार्थ दाक्षिणात्य राज्यात गेले व तिथेच स्थायिक झाले. सुरवातीच्या २०-३० वर्षांमध्ये त्यांचा गावाकडे संपर्क होता पण कालांतराने तो तुटला, गावातील वयोवृद्ध माणसे याबद्दल सांगायची. या गावातील चंद्रकांत गायकवाड हे रजनीकांत यांचे जवळचे नातेवाईक. चंद्रकांत यांचे आजोबा आणि रजनीकांत यांचे पणजोबा हे सख्खे भाऊ होते. गावामध्येही रजनीकांत हे याच गावाचे असल्याची चर्चा व्हायची पण ठोस अशी माहिती कोणाकडेच नव्हती. दहा महीन्यांपुर्वी लक्ष्मण पोटे यांनी दूरदर्शनवर रजनीकांत यांची मुलाखत पाहिली होती त्यात ‘माझे मूळ गाव जेजुरीच्या पूर्वेला आहे’ असे सांगितले होते. त्यामुळे गावकर्यांमध्ये एक आशा उत्पन्न झाली, रजनीकांत हे शूटिंगसाठी लोणावळा येथे येणार असल्याचे गावकर्यांना कळताच त्यांनी समक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व त्यांना आपल्या मूळ गावाबद्दल सांगितले व गावी येण्याचा आग्रह केला.
रजनीकांत यांनी हे निवेदन वाचताच ग्रामस्थांशी थेट मराठीतच बोलायला सुरवात केली. मावडीचे सरपंचांना त्यांनी आलिंगन देत मी गावाला नक्की येतो, असे म्हणाले व आपुलकीने संवाद साधला. गावासाठी काय देऊ असा प्रश्नही त्यांनी विचारला व गावकर्यांनाही चेन्नईला येण्याचे आमंत्रण देत स्वत:च्या मोबाईल कॅमेऱ्याने ग्रामस्थांची छायाचित्रे काधून घेतली.
रजनीकांत यांना दाक्षिणात्य राज्यात अगदी देवासमान मानतात कारण त्यांची ‘समाजसेवा’….
ते त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या एकूण ४०% एवढी रक्कम समाजसेवेसाठी वापरतात (शिवाजी-द बॉस या चित्रपटासाठी त्यांनी २० कोटी रुपये घेतले होते त्यातील ८ कोटी त्यांनी चॅरीटी संस्थांना दिले.) आणि महत्त्वाचे म्हणजे ते एकाही उत्पादनाची जाहिरात करत नाहीत त्यामागे त्यांचा उद्देश एकच कि लोकांना चुकीचा संदेश जाऊ नये (नाहीतर आपले बच्चन साहेब बिस्किटांपासून बोरोप्लस पर्यंत सर्व जाहिरातीत झळकतात. बच्चन साहेब आता फक्त संडासच्या डब्याची जहिरात करायचे बाकी आहेत. ती पण करतील एखादे दिवशी ) आज मितीला रजनीकांत हे भारतातील सर्वात महागडे सुपरस्टार आहेत. मनोरंजन व्यवसायातील प्रसिद्ध व्यक्ती,चित्रपटातील एक मोठे व्यक्तीमत्त्व, आणि ख्यातनाम तमिळ चित्रपट अभिनेते व परोपकारी / लोककल्याणकारी व्यक्ती आहे.एम.जी.रामचंद्रन नंतरचे सर्वात यशस्वी कलाकार म्हणून त्यांची ख्याती आहे.ते गेल्या तीन हून अधिक दशकांपासून तमिळ चित्रपट सष्टीवर अधिराज्य गाजवत आहेत.तमिळ आणि एकंदरीतच दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीचे अनभिक्षीत सम्राट, प्रेक्षकांची गर्दी खेचून आणणारे,आपल्या संवादफेकी बद्दल प्रसिद्ध आणि आपल्या विशिष्ट अभिनय शैलीसाठी रजनीकांत जाणले जातात. हे तमिळ चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेते आहेत. दक्षिण भारतात त्यांच्या नावावर सर्वात जास्त यशस्वी चित्रपट आहेत. त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत कधीही काम केले नाही. ते भारतातील व आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार आहेत. ‘शिवाजी द बॉस’ चित्रपटासाठी त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते.रजनीकांत हे भारताबाहेर अनेक देशात लोकप्रिय अभिनेते आहेत,तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे.जपान मध्ये त्यांचे चित्रपट अधिक लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे व त्यांचे फॅनक्लब्स देखील आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. वयाच्या ६६ व्या वर्षीही ते चित्रपटात मुख्य नायिकेची भुमिका निभावतात.
मात्र, जयललिता यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांचा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. यंदा आपला वाढदिवस धामधुमीत साजरा न करण्याचं आवाहन रजनीकांतनी चाहत्यांना केलं आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांसाठी एक आवाहनही केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply