रडतोस तू, कण्हतोस तू, कसले जिणे जगतोस तू?
चल ऊठ तू चल पेट तू कसली तमा करतोस तू?
दुसरा कवी जर ऐकला, कविता मला म्हणते कशी
तुज लाभली मनमोहिनी तिकडे उगा बघतोस तू
कुठली तरी धर तू दिशा, कुठली तरी धर वाट तू
न अलीकडे, न पलीकडे मधल्यामध्ये मरतोस तू
छळ प्रीतिचा बघ हा कसा अडकूनही तुज टाकले
उठल्यावरी निजतोस तू ! निजल्यावरी उठतोस तू !
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply