नवीन लेखन...

राजकारणाचं नाटक नथुराम गोडसे वरुन





मी नथुराम गोडसे बोलतोय..या नाटकावरून गेले काही दिवस जे काही राजकारण चालू आहे यावरून एकच नि:कर्ष निघतो. हे गांधीसाठी गांधीच्याविचारांसाठी नसून ते ठाण्यातील राजकारणापुरतेचं मर्यादित आहे.. कारण हे राजकारण करणार्‍या आव्हाडसाहेबांचा हट्ट हा ठाण्यातल्या गडकरीमध्ये नाटकाच्या प्रयोगाला बंदी लावण्यापुरताचह मर्यादित आहे. या आधीही ठाण्यात

झालेल्या ८४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात आवंहाडसाहेबांनी नथुराम गोडसेंवरून केलेला राजकीय तमाशा हा गांधीवादी नक्कीच नव्हता ना ह्या नाटकाच्या प्रयोगाबद्दल आवाज उठवणं…गांधीवादी आहे.त्यांना हया नाटकाच्या प्रयोगावर बंदी घालायाचीच असेल तर मग ती फक्त ठाण्यातचं का? संपुर्ण महाराष्ट्रात वा देशात का नाही? ठाण्याजवळ असलेल्या मुंबई आणि नवी मुंबईतही या नाटकाचे प्रयोग लागतात..नवी मुंबईत तर काँग्रेसचेच पालकमंत्री आणि महापौर आहेत..मग तिथे या नाटकाचे प्रयोग लावलेले त्यांना मंजूर आहे..?

मुळात हे नाटक चालू द्यायचे वा पाडायचे हे मायबाप प्रेक्षकांनी ठरवलेलचं बरं .. कारण ही लोकशाही आहे आणि कुठलीही जोरजबरदस्ती करणं हे गांधीच्याही तत्वात बसणारें नाही हे गांधीवादी आव्हाडसाहेब विसरलेत वाटतं?

या नाटकाला सेन्सॉर बोर्डानं संमती दिली.. उच्च न्यायालयानंही परवानगी दिली.. मात्र ठाण्यातल्या आव्हाडसाहेबांच्या लेखी उच्च न्यायालय, सेन्सॉर बोर्ड याची किंमत नाही असं वाटतं… का आता इथुन पुढे असे विषय घेऊन नाटक करण्यास इच्छुक असणार्‍यां लेखक दिग्दर्शकांनी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांच्या कार्यालयाचे उबंरठे झिजवुन त्यांची परवानगी घेऊन मगचं नाटक उभ करायचं? <'अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालणे'

खरे गांधीवादी विचार घेऊन जगलात आणि तसे ध्येय घेऊन समाजाचे प्राश्न सोडविलेत तर निश्चितच गांधींवरून राजकारण करण्याची वेळ कुठल्याही नेत्यावर येणार नाही….

— एक पत्रकार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..