साहित्य:
अडीच लिटर दुधाचे पनीर
दोन किलो साखर
२ ते ३ केशर काड्या
एक टेबलस्पून गरम दूध
आतील सारणासाठी: प्रत्येकी २० ग्रॅम काजू, बदाम, पिस्ते
१/२ टीस्पून वेलची पूड
१ टेबलस्पून पिठीसाखर
कृती:
सर्व सुक्या मेव्याची पूड करुन घ्यावी. त्यात साखर व वेलची पूड मिसळावी. गरम दूधात २ ते ३ केशर काड्या घालाव्यात. चुरुन घ्याव्यात. यातील २-४ थेंब सुक्या मेव्याच्या पुडीत घालावेत. नीट कालवून घेऊन या पुडीचे वाटाण्याएवढे गोळे करावेत. पनीर खूप मळून घ्यावे. त्यामध्ये उरलेल्या केशर-दुधाचे मिश्रण घालावे. पनीरचे लहान लिंबाएवढे गोळे करावेत. ते करताना प्रत्येक गोळ्याच्या आत आधी केलेली सुक्या मेव्याची गोळी घालावी. साखरेत थोडे पाणी घालावे. आणि त्याचा दाट पाक करुन घ्यावा. मग त्यात तयार गोळे घालावेत व शिजवावेत. पाच पाच मिनिटांनी या पाकात अर्धा कप पाणी घालत जावे. दोन वेळा केल्यानंतर हे गोळे फुललेले दिसतील. मग त्यात पुन्हा दोन कप पाणी घालावे. मंद आचेवर उकळी आणावी. झाकण ठेवून आच काढावी. रात्रभर ठेवावे व सकाळी थंड करुन खावे चमचमीत राजभोग !!
— सौ.सुरेखा कुलकर्णी
Leave a Reply