जोधपूरजवळ घटियाला येथील प्राचीन स्तंभावर गणेशस्तुतीचा लेख कोरलेला आहे. तो इ. स. ८६२ सालचा आहे. स्तंभाच्या शिखरावर चार गणेश पाठीला पाठ लावून बसलेले आहेत. त्यांची तोंडे चार दिशांकडे आहेत. जयपूर लोहमार्गावरील सवाई माधोपूरजवळ चौथका बरवाड स्टेशनजवळील डोंगरावर माताजीच्या देवळात गणपती मूर्ती असून गेल्या कित्येक वर्षांपासून अखंड ज्योत तेथे तेवत ठेवली आहे. तसेच सोहागपूर येथे सहा हातांची नृत्य करणार्या गणपतीची मूर्ती पाहावयास मिळते. शंकरगड येथील शिवमंदिरात सूर्यनारायणाच्या जवळच शिव-पार्वती-गणेश यांची मध्ययुग काळातील सुंदर मूर्ती आहे. रणथंबोर गणपती मंदिर राजस्थानात प्रसिद्ध आहे. उदयपूर येथील घटेश्वराच्या देवळाबाहेर तोरणाप्रमाणे स्तंभावर गणेश, नारद यांची देवळे आहेत. मेवाडमधील उत्कृष्ट शिल्पकृतीचे हे नमुने म्हणून दाखविले जातात.
जगदीश पटवर्धन वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply