पेशवेकालीन साम्राज्यातल्या एक निप:क्षपाती न्यायमूर्ती रामशास्त्री यांनी विद्यमान त्यांच्या भाचाच्या खुनाच्या आरोपाखाली फर्मावलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेवर ह्या चित्रपटाची कथा आधारीत आहे. चित्रपटात अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साकारण्यात आल्यामुळे, पेशवेकालीन इतिहासच डोळ्यासमोर उभा राहतो. गजानन दामले यांच्या दिग्दर्शकीय प्रतिभाशैली आणि केशवराव भोळे यांच्या अवीट गोडीच्या संगीताने तसेच अनंत मराठे, ललिता पवार, गणपतराव, हंसा वाडकर, मास्टर विठ्ठल यांसारख्या कलाकारांना घेऊन करण्यात आलेला हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला “बेंगॉल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन” चा सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कारही मिळाला होता.
—
Leave a Reply